प्रतिष्ठा न्यूज

डेरला जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेत अग्रेसर : शिक्षण विस्तार अधिकारी- कापसे

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : लोहा तालुक्यातील डेरला येथील जिल्हा परिषदेची शाळा विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गुणवत्तेत अग्रेसर असल्याचे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी- अंजली कापसे यांनी केले.
इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत असणाऱ्या या शाळेची दि.12 फेब्रुवारी रोजी शिक्षण विस्तार अधिकारी- अंजली कापसे यांनी दिवसभर शाळा तपासणी करून शिक्षक सहविचार सभा घेण्यात आली.
या सहविचार सभेचे प्रास्ताविक- राज्य पुरस्कार प्राप्त शाळेचे मुख्याध्यापक- पंडित पाटील पवळे यांनी केले.
पुढे बोलताना कापसे मॅडम यांनी डेरल्याच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली व दुसरीला शिकविणाऱ्या शिक्षिका- मनिषा पवार, तसेच इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षिका- सारीका बोधनकर यांच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक करून बालसभा, हस्तलिखित, भित्तीपत्रके, परिसरात दिलेल्या भेटी, विविध स्पर्धा, पालक सभा सह सातत्यपुर्ण विविध उपक्रम, नवोक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेणारे उत्कृष्ट कार्य केले त्यामुळे ही शाळा शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर असल्याचे सांगितले. तसेच या प्रमाणे अन्य शाळानेही आपली शाळा व विध्यार्थी गुणवत्तेत पुढे घेऊन जाण्यासाठी डेरल्याच्या शाळेचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. यावेळी कापशी बु. केंद्राचे केंद्रप्रमुख- सुभाष पाटील पानपट्टे, सोनखेड केंद्राचे केंद्रप्रमुख- व्यंकटेश केंद्रे, व्यक्तीमत्व विकास तज्ज्ञ- गणपत चव्हाण, प्रमोद गायकवाड, जे.पी.कल्याणकस्तुरे, गायकवाड आदिसह शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.