प्रतिष्ठा न्यूज

आनंदी फार्मसी कॉलेज व नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सतीश देसाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आनंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या आनंदी फार्मसी कॉलेज व नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत डोळे तपासणी शिबिर कळंबे तर्फ कळे येथे  दि.१० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. तसेच संस्थेच्या  मुख्य कार्यालयात दुपारी  सतीश देसाई यांच्यावरील हस्तलिखिताचे व व्हिडिओचे अनावरण केले जाणार आहे. त्यावेळेस त्यांना शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमाचे हे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी  डॉ. ग. गो.जाधव महाविद्यालय येथे  गगनबावडा तालुक्यातील पहिला पी एस आय व महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अरुण  पाटील याचा तसेच गगनबावडा तालुक्यातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये व पोलीस भरतीमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुण्या  म्हणून तहसीलदार डॉ.शैलजा पाटील उपस्थित राहणार आहेत असे संस्थेचे सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.