प्रतिष्ठा न्यूज

आम आदमी पार्टी करणार अस्वले मळा, वार्ड क्रमांक २ मधील रहिवाशांच्या प्रश्नाबाबत तीव्र आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : आम आदमी पार्टी संपर्क अभियाना अंतर्गत आम आदमी पार्टीने मिरजेच्या वार्ड क्रमांक २ मधील मेघजीभाईवाडी व अस्वले मळा परिसरातील नागरिकांची भेट घेतली. सदर भेटीत PRA TOOLS चा वापर करून त्यांनी स्थानिक रहिवाश्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मेघजीभाईवाडी येथे ड्रेनेज व आरोग्याच्या समस्या आढळून आल्या तसेच अस्वले मळा परिसरातील नागरिकांना तर महानगर पालिकेने रस्ता, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट अशा मुलभूत सुविधा देखील दिल्या नसल्याचे आढळून आले. आज या संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य असून गटारीच्या पाण्याचा निचरा होत नसलेने सगळीकडे दुर्घंधी पसरली आहे. रस्त्यांची अवस्था तर खूपच बिकट आहे व स्ट्रीट लाईट देखील महापालिकेने दिले नसल्याने याभागात संपूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. सदर भागात घंटा गाडी, औषध फवारणी देखील होत नसल्याचे आढळून आले. अशा परिस्थितीत लोक कसे राहतात हेच नेमके कळत नाही.
सदर प्रश्नी आम आदमी पार्टी ही स्थानिक रहिवाश्यांना घेऊन मंगळवारी आयुक्त साहेबांना निवेदन देणार असून जर येथील स्थानिक रहिवाश्यांच्या प्रश्नावर लवकर तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मिरज शहर अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी दिला. यावेळी सांगली शहर समिती सह-समन्वयक आरिफ मुल्ला, आम आदमी पार्टी युवा उपाध्यक्ष तौफिक हवलदार व संजय साबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.