प्रतिष्ठा न्यूज

माजी चेअरमन तुळशीराम केंद्रे यांचे निधन- बी. टी. केंद्रे यांना पितृशोक

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : – कंधार तालुक्यातील देवईची वाडी येथील जेष्ठ नागरिक, माजी चेअरमन तथा गावातील सामाजिक कार्यकर्ते, तसेच शिक्षण प्रेमी व्यक्ती तुळशीराम गंगाराम केंद्रे- वय 85 वर्षे यांचे दि.20 जानेवारी रोजी सायंकाळी 7:00 वाजता दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर दि.21जानेवारी 2024 रोज रविवारी सकाळी- ठिक 11:00 वाजता मुळगाव देवईची वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै.तुळशीराम गंगाराम केंद्रे यांचे पश्चात- दोन मुले, एक मुलगी, दोन सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. रायवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक- बी.टी.केंद्रे व कोंडीबा केंद्रे (लिपिक) यांचे वडील तर सहायक पोलिस निरीक्षक- गंगाप्रसाद केंद्रे, डॉ.रामानंद केंद्रे, यांचे आजोबा होत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.