प्रतिष्ठा न्यूज

चौफेर प्रगती करणाऱ्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी हातनूर शाळेचे काम जिल्ह्यात आदर्शवत : गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड यांचे गौरवोद्गार

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी/दि. 24 : शालेय व स्पर्धा परीक्षा गुणवत्ता, क्रीडा स्पर्धा याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही हातनूर शाळा अव्वल असून शाळेचे काम जिल्ह्यात आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार शाळेच्या स्नेहसंमेलन ‘फुलोरा 2023’ च्या निमित्ताने गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड यांनी काढले.
आठवी एन. एम. एम. एस.,आठवी स्कॉलरशिप मध्ये तासगाव तालुक्याच्या गुणवत्तेत योगदान देणारी शाळा म्हणून हातनूर शाळेची संपूर्ण सांगली जिल्ह्यात ओळख आहे.
गतवर्षी पाचवी शिष्यवृत्ती मध्ये पाच विद्यार्थी आणलेले महाराष्ट्र युवारत्न शशिकांत पाटील सर यांच्याकडे सध्या पहिलीचा वर्ग असल्यामुळे त्यांच्या संकल्पनेतून व कल्पकतेतून ‘फुलोरा 2023’ स्नेहसंमेलन साकारले गेले. कोरोना व स्पर्धा परीक्षांच्या व्यस्ततेतून गेली पाच वर्षे शाळेचे स्नेहसंमेलन होऊ शकले नव्हते.
मुख्याध्यापक वसंतराव पाटील, शशिकांत पाटील, शिक्षक महादेव जंगम, प्रमोद कदम, सुनिता कुंभार, वैशाली पवार, शशिकला पाटील, कलावती कदम, ज्योती कापसे,जोत्स्ना पाटील, पल्लवी भोसले, सुनिता एडके या शिक्षकांच्या महिन्याभराच्या परिश्रमातून ‘फुलोरा 2023’ यशस्वी झाले.
कार्यक्रमाचे प्रतिमापूजन व उद्घाटन माजी सरपंच ज्येष्ठ शिक्षणतज्ञ काशिनाथ पाटील, माजी प्राचार्य बाळासाहेब पाटणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनआण्णा पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन पाटील, सरपंच प्रकाश एडके, पदाधिकारी व पालक तानाजी साळुंखे, महादेव पाटणकर, रणदीप पाटील, शिवम पाटील,ज्ञानेश्वर पाटील, वालूताई कोळी,दादासो विलासभाऊ पाटील, पतंगराव पाटील, तानाजी पाटील, शिवाजी पाटील, डॉक्टर अमोल सोनटक्के, अजित सोनटक्के यांचे हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाला भेट देणाऱ्या गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड यांचे मुख्याध्यापक वसंतराव पाटील व विस्ताराधिकारी प्रकाश कांबळे यांचे महाराष्ट्र युवारत्न शशिकांत पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला भेट दिलेले शिक्षक मुरगेश पाटील व अधिक शितोळे यांनी कार्यक्रमावेळी आतषबाजीची बाजू उचलून धरत कार्यक्रम उजळून टाकला.
कार्यक्रमामध्ये शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जिल्हा परिषद हातनूर शाळेला दहा वर्षे योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र युवारत्न शशिकांत पाटील यांच्या संकल्पनेतून शिक्षिका सुनिता कुंभार, वैशाली पवार व प्रमोद कदम यांचा गटशिक्षणाधिकारी यांचेकडून विशेष सत्कार करण्यात आला, तसेच शिल्ड देऊन
‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ म्हणून इयत्ता आठवीची विद्यार्थिनी अनुराधा पाटील व ओम पाटणकर यांचा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून गौरव करण्यात आला.
ज्योती कापसे व प्रमोद कदम या शिक्षक द्वयीनी सुंदर सूत्रसंचालन केले.
प्रचंड मोठे स्टेज, अद्ययावत ध्वनी व प्रकाश यंत्रणा स्वप्निल व संजय भाट यांच्या माध्यमातून तर संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी व छायाचित्रण करून युट्युब वर प्रसारण विनामूल्य मारुती कोष्टी व श्रेयस कोष्टी यांच्या योगदानातून करण्यात आले.
तत्पूर्वी सकाळ सत्रात संपूर्ण साडेतीनशे विद्यार्थी व पालकांचे स्नेहभोजन शिक्षक स्टाफ व पालक चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महादेव जंगम यांचे देखरेखीखाली पार पडले.
हजारो ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 21000 रुपयांची बक्षिसे शाळेला दिली,यामध्ये 40% बक्षिसाची रक्कम इयत्ता पहिलीच्या पालक रणदीप पाटील, पतंगराव पाटील व त्यापैकी संजयकाका युवामंचचे अध्यक्ष, पालक दादासाहेब विलासभाऊ पाटील यांनी 4500 रुपये बक्षीस देत इयत्ता पहिलीच्या गुणवत्तेवर विश्वास व्यक्त करत एकंदरीत कार्यक्रमाबद्दल मुलांचे व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.
नेटके नियोजन व डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या जिल्हा परिषद शाळा हातनुर ‘फुलोरा 2023’ चे हातनुर व हातनूर पंचक्रोशीमध्ये चर्चा व कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.