प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथे ब्राह्मण सभेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:ब्राह्मण सभा तासगावच्या वतीने ब्राह्मण समाजाचे मूळ पुरुष भगवान भार्गव परशुराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून मिरजचे श्री.महादेव जोगळेकर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री.अँड.अजित पांडूरंग कुलकर्णी हे होते.यावेळी भगवान परशुराम यांच्या
प्रतिमेचें विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री महादेव जोगळेकर यांनी भगवान परशुरामां विषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले,  त्याचप्रमाणे आपल्या मनोगतात सर्वांचे आचारविचार कसे असावेत त्याचप्रमाणे संस्काराचे महत्व पटवून दिले.समाजात घडणाऱ्या चांगल्या व वाईट घटनांकडे सर्वांनी विचार करून वागले पाहिजे असेहि त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.लक्ष्मण केशव जोशी यांनी केले.त्याचप्रमाणे श्री.जगदिश कालगावकर व अथर्व जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अभिजीत प्रकाश जोशी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री परशुरामांच्या आरती व सामुदायिक पसायदानाने झाली.यावेळी समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतें.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.