प्रतिष्ठा न्यूज

क्रांतीयोद्धा- मनोज पाटील जरांगे यांची 8 डिसेंबर रोजी मारतळा येथे विराट सभा: लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजक समितीचे आवाहन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : मराठा व कुणबी हा एकच असल्यामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाचा ओबीसी (OBC) प्रवर्गात समावेश करावा या मुख्य मागणीसाठी मराठा क्रांतीयोद्धा- मा.मनोज पाटील जरांगे यांनी जीवाची बाजी लावून ऐतिहासीक जनआंदोलन उभे केले आहे. मा.मनोज पाटील यांच्या निष्कलंक व स्वाभिमानी लढ्यामुळे शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी न्यायमुर्ती- संदीप शिंदे समिती गठीत केली आहे. आणि समाजाला आरक्षण देण्यासाठी दि.24 डिसेंबर 2023 ची मुदत दिली आहे. परंतु काही ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या बाबतीत नको ती गरळ ओकुन विरोध करीत आहेत. मा.मनोज पाटील अतिशय संयमाने कोटी-कोटी मराठ्यांच्या सभा घेत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांच्या या लढ्यामुळे मराठा आरक्षणाचे यश हे अंतिम टप्प्यात आले आहे. तेंव्हा या मराठा आरक्षण लढ्याचा एकभाग म्हणून लोहा तालुक्यातील उमरा सर्कलच्या वतीने नांदेड-हैद्राबाद या राज्य महामार्गावरील मारतळा येथे दि.8 डिसेंबर 2023 रोज शुक्रवारी दुपारी-12:00 वाजता क्रांतीयोद्धा मा. मनोज पाटील जरांगे यांच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तेंव्हा आपणही या ऐतिहासीक लढ्याच्या सभेचे साक्षिदार होण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन सकल मराठा समाज उमरा सर्कलच्या वतीने आयोजक समितीने केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.