प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली पहाणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी पाहणी केली त्यानंतर नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदाराचे संपूर्ण कर्ज माफ करा, द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा माजी खा राजू शेट्टी यांनी दिला.
सांगली जिल्ह्यातील मिरज तासगाव कवठेमहांकाळ आदी भागातील द्राक्ष बागाची पाहणी माजी खा राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, सावकार मादनाईक, संजय बेले, संजय खोलखुंबे ,भरत चौगुले, नंदू नलवडे, श्रीधर उदगावे, बाळासाहेब सुरेश वसगडे सुहास केरीमाने आदींनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला कोंगनोळी येथील शेतकरी प्रकाश देसाई या शेतकऱ्याने द्राक्ष बागेचे नुकसान झाले त्या मुळे आत्महत्या केली त्याच्या कुतुबियाचीही भेट घेवून सात्वन केले
त्यानंतर त्या परिसरातील नुकसान ग्रस्त बागांची पाहणी केली कोंगनोळी ग्रामपंचयतीतर्फे छोटेखानी कार्यक्रम झाला यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले राज्य सरकारने नुकसान ग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची कर्जे माफ करायला हवीत त्याच बरोबर द्राक्ष पीक विमा योजना शेतकरी हिताची नसून केवळ कंपनी हिताची आहे त्यामुळे ती बदलयला हवी ऊस उत्पादक शेतकऱ्या प्रमाणे द्राक्ष बागायतारांनी संघटित होण्याची गरज आहे राज्य सरकारने मदतीचा हात न दिल्यास रस्त्यावर उतरून न्याय देवू असा इशारा त्यांनी दिला यावेळी राजवर्धन घोरपडे भूपाल पाटील प्रा एस बी भातमा रे गणपतराव. साळुंखे राजू पोतदार बाळू पाटील दीपक मगदूम डॉ कुडचे शितल बोरगावे शंतिनाथ लिंबेकाई उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.