प्रतिष्ठा न्यूज

*कितीदा नव्याने तुला आठवावे* म्हणत शाळेच्या आठवणीत रमले विद्यार्थी विद्यार्थिनी… तासगाव चंपाबेनच्या 1999 बॅचचे सवंगडी तेवीस वर्षांनी भेटले…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : इयत्ता दहावी ‘ब’ तुकडी म्हणलं की ‘ढ’असा शिक्का अप्रत्यक्षपणे पडलेलाच.मात्र दहावी झाल्यानंतर आयुष्यात अनेक कार्यात पुढाकार घेवून या मुलांनी आणि मुलींनी आपल्यावरील शिक्का पुसून टाकला.हीच मुले आणि मुली तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र आली.1999 ची दहावीची परीक्षा दिल्यानंतर थेट 2023 मध्ये भेटलेल्या चेहऱ्यांना ओळखून त्या वेळच्या जुन्या आठवणी ताज्या करणे,गेल्या 23,24 वर्षातील सुखदुःख वाटून घेत तासगावच्या चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर 1999 च्या बॅचचें गेट-टुगेदर मोठ्या उत्साहात पार पडले.एक दिवस स्वतःसाठी वेळ काढूया,आठवणींचा खजिना सोबत नेऊया म्हणत गेट-टुगेदर चा कार्यक्रम येथील शिवप्रताप हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता.सकाळी अकरा पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचें पूजन करून प्रार्थना आणि ध्येयमंत्र म्हणून जे काळाच्या ओघात सोडून गेले त्यांना श्रद्धांजली वाहीली गेली.त्यानंतर उपस्थितानी आपली ओळख करून देत सध्या आपण काय करतो याची माहिती करून दिली.माहिती सांगण्यासाठी व्यासपीठावर गेलेल्याच्या बाकीच्यांच्या कडून जुन्या आठवणी ताज्या केल्या जात होत्या.विविध स्थरावर आपली कामगीरी योग्य पद्धतीने बजावणारे आणी आपली छाप टाकणारे ही अगदी लहाण होवून या गेट टू गेदरचा आनंद लुटताना दिसले.अतिशय हास्य विनोदात तसेच भावनिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर भोजन झाले.त्यानंतर विवेक खेराडकर आणि विना पाटील यांचा फणी गेम चा कार्यक्रम ठेवला होता.त्यामुळे गेट-टुगेदर च्या कार्यक्रमाला चार चांद लागले.तेरे जैसा यार कहा पासून ते अनेक मराठी गाणी गाऊन अनेकांनी आपल्या अंगातील कलेला स्वतःच वाव मिळवून दिला.हिंदी मराठी गाण्यावर सगळ्यांनीच धमाल मस्ती करत डान्स केला.इथून पुढच्या काळात फॅमिली गेट-टुगेदर तसेच दरवर्षी भेटायचं, आणि एकमेकांच्या सुखदुःखात सर्वांनी एकत्रित एक कुटुंब म्हणून सहभागी व्हायचं अशा आणा भाका  घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.यावेळी संजना पाटील,नीलिमा माने पाटील,शीतल कांबळे,अनुराधा बोळे,दीपाली माळी,वासंती कोदांडे(खेराडकर )भाग्यश्री पाटील,गीतांजली राजमाने, सोमनाथ टकले,अमोल रावळ,उदय माळी राजेंद्र पवार,सचिन फाळके,अमोल भोसले, विवेक पाटील,विजय जमदाडे श्रीकांत पाटील,विनायक पाटील, कुलदीप बेडगे,दत्तात्रय जाधव,किरण कुंभार उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.