प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तहसील कार्यालयावर दलित महासंघाचा मोर्चा…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव तालुक्यातील प्राथमिक ग्रामीण आरोग्य केंद्रात सोयी-सुविधा अभावी रुग्णाची हेळसांड होत आहे.रुग्णालयातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष देण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयावर म्हशी  बोड मोर्चा काढण्यात आला.यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकास पुष्पहार घालून म्हैस सोबत घेऊन जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चास सुरुवात झाली.येथील प्राथमिक ग्रामीण आरोग्य केंद्रात सुविधांचा मोठा अभाव आहे,रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक सोयी सुविधांचा तुटवडा आहे,तसेच तासगाव ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयालां दर्जा ददेण्यात यावा,अत्याधुनिक सिटी स्कॅन,एक्स रे, आय.सी.यू.पुरेसे बेड,आवश्यक ब्रदर स्टाफ,या समावेत सर्व सोयीसुविधा युक्त स्वतंत्र अशी पोस्ट मार्टम रूम उभारावी,पी.एम.करता स्वतंत्र कर्मचारी नेमावा,खाजगी व्यक्ती कडून पि.एम.करतेवेळी होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी,तालुक्यातील ग्रामीण भागात व्यक्ती मयत झालेस त्याचे पी.एम.करण्याचे अधिकृत आदेश तासगाव डॉक्टर यांना करावेत,अशा मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले.
सदर मोर्चावेळी संस्थापक अध्यक्ष उत्तमराव मोहिते उपस्थित होते.सदर मोर्चाचे नेतृत्व राज्य अध्यक्ष टिपू पटवेगार,राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे यांनी केले.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार,राकेश चंदनशिवे,जिल्हा उपाध्यक्ष अजित आवळे,आशितोष देवकुळे,महेश देवकुळे,राज्य उपाध्यक्ष ओंकार देवकर,पिलू वारे,महावीर चंदनशिवे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.