प्रतिष्ठा न्यूज

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस सांगलीत अनाथआश्रमधील मुलींच्या हस्ते संविधान वाचन व केक कापून साजरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सांगली विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांचा 65 वा वाढदिवस आज सांगलीतील वेलणकर अनाथआश्रम मधील मुलीनं समवेत साजरा करण्यात आला. त्यावेळी मुलीं कडून भारताच्या संविधानाचे वाचन करण्यात आले. वाढदिवसाचे प्रतीक म्हणून लहान मुलींच्या हस्ते केक कापण्यात आला. नंतर मुलींना फळे व लाडू चे वाटप करण्यात आले.सर्व मुलींनी अजित दादा यांच्या दीर्घायुष्यासाठी व भावी वाटचालीसाठी प्रार्थना केली.
तसेच सांगली येथील बेघर नागरिकांना व अग्नीशमन दलाच्या जवानांना फळे व लाडू वाटप करण्यात आले.
यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बिरेंद्र थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन समिती सदस्य अतहर नायकवडी, माजी नगरसेवक विष्णू माने, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान, सांगली शहर उपाध्यक्ष वसीम नायकवडी, प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील, सरचिटणीस सोहेल इनामदार, महिला शहरजिल्हाध्यक्ष राधिका हारगे, महिला कार्याध्यक्ष आयेशा शेख, कामगार सेलचे अध्यक्ष मुजफ्फर सनधी, प्रसाद पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.