प्रतिष्ठा न्यूज

हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान !

‘हलाल’ उत्पादनांच्या सक्तीविरोधात ‘मॅकडोनाल्ड आऊटलेट’च्या बाहेर आंदोलन !

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : गेल्या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्‍यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुस्लिम देशांच्या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ होऊ लागली आहेत. मुळात भारत सरकारच्या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय ? आज मॅकडोनल्ड्स, केएफ्सी, बर्गरकिंग, पिझ्झा हट यांसारख्या नामवंत कंपन्या त्यांच्या आऊटलेटमध्ये हलाल नसलेले खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याने हिंदू, जैन, शीख अशा गैर-मुस्लिम समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ सक्तीने विकत आहेत. भारतातील 15 टक्के मुसलमान समाजासाठी 80 टक्के हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही. भारताला धर्मनिरपेक्ष म्हणायचे आणि धर्माच्या आधारावर उत्पादनांच्या इस्लामी प्रमाणिकरणाचा घाट घालायचा, हा काय प्रकार आहे ?, असा प्रश्‍न हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थित केला.
‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने यंदाच्या दिवाळीत ‘हलाल मुक्त दिवाळी’ हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत कोल्हापूर येथे ‘मॅकडोनाल्ड आऊटलेट’च्या बाहेर आंदोलन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी, शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव , धर्मप्रेमी रविंद्र खोचीकर, भुयेवाडी येथील शिवसेनेचे रमेश पाटील , श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दशरथ शिंदे आणि श्री. विजय आरेकर , बजरंग दलाचे श्री. विनायक आवळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशांक सोनवणे, सौ. राजश्री तिवारी यांसह अन्य उपस्थित होते

श्री. किरण दुसे पुढे म्हणाले, ‘‘मॅकडोनाल्ड, ‘के.एफ.सी’ सारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांनी भारतातील त्यांची दुकाने १०० टक्के ‘हलाल’ प्रमाणित आहेत, असे घोषित केले आहे. ‘मॅकडोनाल्ड’मध्ये जाणार्‍या बहुसंख्य हिंदूंना इस्लामी मान्यतेनुसार सिद्ध करण्यात आलेला ‘हलाल’चा पदार्थ देणे हा हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अनादर आहे. भारतातील हिंदूंना खाण्याचे किंवा खरेदीचे संवैधानिक स्वातंत्र्य का नाही ? कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती खपवून घेणार नाही. हल्दीराम, हिमालया, नेस्ले यांसारख्या अनेक कंपन्या त्यांचे शाकाहारी पदार्थ देखील ‘हलाल सर्टिफाइड’ करून विकत आहेत. त्यामुळे हिंदु समाजाने ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने न घेता यंदाची मंगलमय दिवाळी ही हिंदु पद्धतीने ‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करावी, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत.’’

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.