नांदेड हाऊसिंग सोसायटी येथे सहकार महर्षी पद्मश्री शामरावजी कदम व्याख्यानमाला
प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : येथील नांदेड हाऊसिंग सोसायटीविजय नगरच्या वतीने सहकार महर्षी पद्मश्री शामराव कदम यांच्या स्मरणार्थ व्याख्यान मालेचे आयोजन उद्या दि.18 ऑक्टोबर 2022 रोज मंगळवारी केले आहे. विजयनगरातील हनुमान मंदिर येथे संध्याकाळी 6:30 वाजता प्रा. डॉ. बालाजी चिरडे यांचे “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे स्वरुप” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्रा.टी.एस.गोरे हे उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे,
असे आवाहन व्याख्यान मालेचे आयोजक अध्यक्ष- काशिनाथ ईसादकर, उपाध्यक्ष- अनंतराव देशपांडे व सचिव – मारोतराव गंड्रस आदींनी केले आहे.