प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पालिका कर्मचाऱ्यांचें सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा नगरपरिषद, नगरपंचायत राज्य संवर्ग अधिकारी तसेच,आस्थापना वरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्यावर तातडीने कार्यवाही करा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने २९ ऑगस्टपासून बेमुदत संप सुरु केला आहे.मंगळवारी सलग सहाव्या दिवशी तासगाव नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे.महाराष्ट्र शासन अंतर्गत नगरपरिषद,नगरपंचायत राज्य संवर्गातील ३ हजार अधिकारी व स्थानिकचे ६० हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही.तसेच जुनी पेन्शन योजना लागू करा,यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने २९ ऑगस्टपासून काम बंद ठेवत बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.यावेळी,नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन व आपल्या मागण्याविषयी भुमिका व्यक्त करीत संप सुरु ठेवला आहे तर,मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप सुरुच राहील असे नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्यातून सांगण्यात येत आहे.संपूर्ण राज्यात हे आंदोलन सुरू असून मागण्या मान्य होईतो पर्यंत माघार घेणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.राज्यात या आंदोलनाला चांगला प्रतिसाद आहे.तासगाव येथील बेमुदत संपात नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक श्वेता कुंडले,कर निरीक्षक घनश्री पाटील,सहाय्यक कर निरीक्षक डॉ.चेतना साळुंखे, आस्थापना विभाग प्रमुख प्रियांका भोसले,लेखापाल सुयश कुलकर्णी, लेखापरीक्षक शहाबाज शेख, बांधकाम अभियंता ए.सी.औताडे, विद्युत अभियंता प्रवीण चौगुले, पाणीपुरवठा अभियंता मनोज खरात, उद्यान पर्यवेक्षक राहुल माळी, आरोग्य विभागाचे आयुब मणेर, राजेंद्र माळी,राजेंद्र काळे,संतोष गायकवाड,प्रवीण थाबुगडे,आकाश पाटील,विद्या शेटे यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.