प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्याचे सुपुत्र चिकनीस सरांचा १००वर्षे पूर्ण केलेबद्दल मराठा महासंघातर्फे सत्कार

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : ४ सप्टेंबर रोजी १०० वर्षे पूर्ण केलेले श्री गणपतराव नारायणराव चिकणीस (ग. ना. चिकणीस) गुरूजींचा हृद्य सत्कार अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते ५सप्टेंबर शिक्षकदिनी करण्यात आला.सत्काराचे स्वरूप छत्रपती शिवरायांची प्रतिमा,कोल्हापूरी फेटा,शाल, गुलाब पुष्प असे होते.
” त्यांचे मूळ गाव गगनबावडा आहे. कोल्हापूर येथे संपूर्ण आयुष्य शिक्षकी पेशा स्विकारत ध्येयाने हजारो विद्यार्थी घडविले,विद्यापीठ हायस्कूलमध्ये गणितासारख्या रूक्ष विषयाला मराठी भाषेवरील आपल्या प्रभुत्वाने सोपे करीत, कडक शिस्तीचे असतानाही विद्यार्थ्यांना आपलेसे वाटत होते.” असे गौरवोद्गार मुळीक यांनी काढले. यानंतर सत्कार उत्तर देताना चिकणीस सरांनी कृतज्ञता व्यक्त करताना राजर्षी शाहूं महाराजांमुळे आम्ही घडलो. परतूं शाहू महाराज नसते तर आमचे जीवन कसपाटा समान झाले असते असे सांगून त्यांनी शाहूंच्या आठवणीतील चार गोष्टी सांगितल्या.
सत्कार प्रसंगी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील,अशोकराव जगताप, विजयराव राणे, सतिश घाटगे,प्रशांत चिकनीस, अविनाश चिकनीस, अनिल पाटील, अवधूत पाटील यासह सर्व कुटुंबिय उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.