प्रतिष्ठा न्यूज

नाभिक समाजाच्या वतीने विर रत्न जीवाजी महाले यांची यांची जयंती उत्साहात साजरी

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज : सावळज ता.तासगाव येेथे नाभिक महामंडळाच्या वतीने विर रत्न जिवाजी महाले यांची जयंती सावळज येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी दत्तक पालक योजने अंतर्गत तालुक्यातील पाच मुलांचा शाळेचा खर्च तालुका नाभिक सदस्यांनी उचलला तसेच या वर्षी जे समाज बांधव मयत झालेले आहेत त्यांच्या घरी जाऊन दीपावली पोहच करुन त्यांच्या अडीअडचणी समजून घेवून शक्य तेवढ्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तसेच सध्याच्या नवीन काळानुसार नविन हेअर स्टाईल शिकण्यासाठी मोफत प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले, ई-श्रमिक कार्ड, अभा कार्ड यांचा कॅम्प लावून कार्ड काढण्यात आली, तालुक्यातील विविध प्रश्नांवर विचार विनिमय करण्यात आला यावेळी तासगाव तालुका नाभिक महामंडळाच्या वतीने तालुका सचिव पदी अधिक शिंदे यांची निवड जिल्हा सचिव मधुकर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विशाल गायकवाड, तालुका अध्यक्ष राजु काळे, युवा अध्यक्ष अजित काळे, तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.