प्रतिष्ठा न्यूज

मनसेच्या दणक्याने आज बेदाणा सौद्याची सहाय्यक निबंधकांकडून प्रत्यक्ष पाहणी ; नेहमी उधळला जाणार बेदाना आज मात्र थांबला

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव बाजार समितीत सोमवारी सहाय्यक निबंध रंजना बारहत्ते यांनी बेदाणा उधळणीची पाहणी केली.आजच्या सौद्यात मात्र बारहत्ते यांच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान बेदाणा उधळण थांबल्याचे दिसून आले.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी  उधळनीवर तीव्र संताप व्यक्त केला, या उधळणीचा वस्तुनिष्ठ अहवाल दुय्यम निबंधक सांगली यांना पाठवणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.यावेळी निमणीचे उपसरपंच आर डी पाटील उपस्थित होते.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा उधळण करून अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू आहे,अशी तक्रार सांगली जिल्हा मनसे संघटक अमोल काळे यांनी दिली होती.बेदाणा उधळण थांबवून शेतकऱ्यांची लूट थांबवा अन्यथा खळ खट्याक आंदोलन करण्याचा इशारा दिल्या नंतर डी डी आरच्या आदेशानुसार बेदाणा उधळनीची सोमवारी १२ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून  सहाय्यक निबंधक रंजना बारहाते यांनी पाहणी केली.यावेळी नेहमी सौदे काढताना बेसुमार पद्धतीने उधळला जाणारा बेदाणा सोमवारी व्यापारी बॉक्स मधून मूठ भरून घेत ती मूठ परत बॉक्समध्ये टाकत असल्याचे चित्र दिसले.इतर वेळी हा बेदाणा उधळून लोखंडी जाळीत सांडला जात होता,व त्याची तूट मनमानी पद्धतीने धरली जात होती.मात्र सहाय्यक निबंधकांच्या पाहणीमुळे व्यापारी हबकले होते.काही जणांनी सौदयास  दांडी मारली होती.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी बेदाणा उधळणीवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या,असून उधळण पूर्णपणे बंद होण्याची मागणी त्यांनी निबंध सहायक निबंधकांच्याकडे केली आहे.यावेळी बारहत्ते यांनी सर्व बेदाणा उधळणीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ही घेतल्या या सर्व प्रतिक्रिया व पाहणी यांचा वस्तुनिष्ठ अहवाल डी डी आर सांगली यांच्याकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वस्तुनिष्ठ अहवाल सादर व्हावा:
आर डी पाटील
सहाय्यक निबंधक यांनी प्रत्यक्ष सौदे सुरू असताना भेट देऊन पाहणी केली.यावेळी उपस्थित असणाऱ्या तासगाव ,मिरज ,मंगळवेढा कवठेमंहांकाळ व कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी व व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.सौद्या वेळी उधळलेल्या बेदाण्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे.जिल्हा उपनिबंधक यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर व्हावा अशी अपेक्षा निमनीचे उपसरपंच आर डी पाटील यांनी व्यक्त केली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.