प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथे गुणवत्ता शोध परीक्षा गुणगौरव सोहळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : सांगली शिक्षण संस्थेमार्फत घेणेत येणाऱ्या गुणवत्ता शोध परीक्षा (TSE) व शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षा बक्षीस वितरण कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवारी सानेगुरुजी नाट्यगृह जोशी गल्ली तासगाव येथे संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे माजी वि‌द्यार्थी श्री अतुल नांदगावकर आर टी ओ कोल्हापूर व अध्यक्षस्थानी सांगली शिक्षण संस्थेचे मा उपाध्यक्ष रवींद्र देवधर,तसेच संस्थेचे ‘ब ‘वर्गीय संचालक अरुण थोरात उपस्थित होते.यावेळी तासगाव तालुक्यातील सर्व केंद्रावरील सर्वसाधारण गुणवत्ता यादीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.आदरणीय अतिथींच्या हस्ते संस्थेच्या वतीने देण्यात येणारे सन्मानचिन्ह व बक्षीस रक्कम देण्यात आली.यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतुल नांदगावकर म्हणाले की,स्पर्धा परीक्षा हा माणसाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे,बालपणा पासूनच या परीक्षांचा विद्यार्थ्यांना सराव असेल तर त्यांच्या मनातील परीक्षांबद्दल असणारी भीती कमी होईल व पुढील आव्हाने पेलण्यास वि‌द्यार्थी सक्षम होतील.सांगली शिक्षण संस्थेने राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष व सांगली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री रवींद्र देवधर यांनी सांगली शिक्षण संस्था राबवत असलेल्या गुणवत्ता शोध परीक्षा व शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षेस सर्व शाळांतील मुख्याध्यापक,शिक्षक व पालकांनी दिलेल्या प्रतिसादा ब‌द्दल व दिलेल्या विश्वासाब‌द्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.इथूनही पुढच्या काळात सर्व शाळांनी जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेत बसवावे असे आवाहनही केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणवत्ता शोध परीक्षा तासगाव तालुकाप्रमुख श्री वैभव राव यांनी केले.कार्यक्रमाचे आभार राधा गोविंद मराठे बालशाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष बल्लाळ यांनी मानले यावेळी बोलताना त्यांनी
स्पर्धा परीक्षेत सामोरे जाताना वि‌द्यार्थ्यांच्या अंगी जिद्द,चिकाटी, मेहनत या गोष्टी असणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शिक्षकांनी आणि पालकांनी घेतलेल्या मेहनती बद्दल त्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता शिवणकर यांनी केले.यावेळी रेखा राजाराम काळे बालक मंदिरचे शालाधिक्षक योगेश खाडीलकर,चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर चे मुख्याध्यापक मुकुंद जोग,गुणवत्ता शोध परीक्षा तासगाव ग्रामीणचे प्रमुख अवधूत माने, भिलवडी ग्रामीणचे प्रमुख विकास बंडगर,तासगाव तालुक्यातील विविध शाळांमधून आलेले मुख्याध्यापक, शिक्षक,पालक वर्ग,गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी,राधा गोविंद मराठे बालशाळेचा सर्व शिक्षक व सेवक वर्ग उपस्थित होता.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.