प्रतिष्ठा न्यूज

भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ सांगली जिल्ह्याच्या वतीने चिंचणी येथे कलाकारांची बैठक संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्ह्यात सर्व ठिकाणी सांस्कृतिक प्रकोष्ठ चे “गाव तिथे प्रकोष्ठ” हे कलाकार संपर्क अभियान सध्या प्रकोष्ठच्या अध्यक्षा अपर्णा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत तासगाव तालुक्यात चिंचणी येथे कलाकारांची बैठक संपन्न झाली तासगाव,चिंचणी खरसुंडी,देशिंग, खरशिंग, भोसे येथून नाट्यकलावंत, शाहीर, तमाशाकलावंत,गोंधळी,वाघ्या मुरळी, वगनाट्य कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरच्या या बैठकीत कलाकारांनी विविध अडचणी,मागण्या
आणि व्यथा मांडल्या कोविड काळानंतर कलाकारांची दयनीय अवस्था झाली आहे.परिस्थिती हालाकिची आहे,हातात पैसा नाही कर्ज मात्र भरपूर आहे तसेच कोविड काळात बंद पडलेले तमाशा, वगनाट्य यांना पुन्हा नव्या उत्साहाने तसेच नव्या रूपात सादर करणे गरजेचे आहे असा सूर या बैठकीत कलावंतांनी मांडला भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष ओंकार शुक्ल यांनी यावेळी मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की सर्व कलाकार,बॅकस्टेज कलाकार इत्यादी लोकांना कोविड काळात शासनाने मदत केली नव्हती वृद्ध कलाकार मानधन योजनेबद्दल नवे फेर बद्दल करणे आवश्यक आहे.भारतीय जनता पार्टीचे शासन आल्यानंतर कलाकारांच्या मानधनात २२०० रुपये पर्यंत वाढ करण्यात आली आहे
सांस्कृतिक आघाडी महाराष्ट्र च्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रियाताई बेर्डे यांनी सांगली दौर्यात मानधनात वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहेच. महाराष्ट्र शासन हे कलाकारांच्या बद्दल संवेदनशील असून सर्व कलाकारांच्या व्यथा शासनापर्यंत एकजुटीने आपण मांडूयात असे त्यांनी सांगितले.
अपर्णा गोसावी यांनी प्रकोष्ठच्या बांधणी संदर्भात माहिती दिली.
महिला शाहीर आणि तमाशा कलावंतांच्या अडचणी समजून घेतल्या,
तसेच वृद्धकलाकार पेंन्शन योजना कलाकारांना समजावून सांगितली त्या संदर्भात लागणारी कागदपत्रे ,अर्ज ईत्यादीची माहिती दिली आणि ग्रामीण भागातील लोककलावंतांच्या पाठीशी प्रकोष्ठ खंबिरपणे ऊभे आहे असे आश्वासन दिले.
यावेळि प्रकोष्ठ चे कोषाध्यक्ष सचिन पारेख यांनी सरल अप बद्दल माहिती दिली ते कसे महत्वाचे आहे ह्या अपचे फायदे काय आहेत ते कसे डाउनलोड करायचे.त्यात माहिती कशी भरायची हे सांगितले. शिवाय कलाकारांशी थेट संपर्क साधत मा.मोदि सरकारच्या अनेक योजनांची माहिती दिली. शाहिर चंद्रकांत गायकवाड हे कायमच लोककलावंतांच्या साठि मदत करायला तत्पर असतात या वेळिहि सर्व कलाकारांना एकत्र आणण्याचे काम शाहिरानी केले.
शाहीर अनिल कोळी, प्रशांत जगताप, चंद्रकांत शिंदे, मधुकर चव्हाण, दिलावर मुजावर, महिला शाहीर अनिता खरात, मनोज कुमार रोकडे, राजेंद्र कोळी, शब्बीर मुजावर,तमाशा कलावंत सुमन ताई,महिला शाहिर हिराबाई खरात तसेच जवळपास पन्नासहून अधिक कलाकार यावेळी उपस्थित होते.
स्वागत शाहीर राजेंद्र गायकवाड, आभार शाहिर सूर्यकांत पोळ यांनी मांडले, अपर्णा पटवर्धन माणिक ताई जोशी राजन काकिर्दे यांनी नियोजन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.