प्रतिष्ठा न्यूज

एम. टी. ई. एस. इंग्लिश स्कुलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धां सांगता सामारंभ उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित एम. टी. ई. एस. इंग्लिश स्कुल मधील वार्षिक क्रीडा स्पर्धांची दिमाखात सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय खो खो खेळाडू श्रद्धा पंडित पाटील तसेच तालुकास्तरीय हँडबॉल व जिल्हास्तरीय खो खो खेळाडू रामराव सुळे लाभले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भूमिपूजन करून, श्रीफळ वाढवून पालकांच्या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या इंदिरा पाटील व उपप्राचार्या अंजना कोळी उपस्थित होत्या.
स्पर्धांची सुरुवात चार ही हाऊसच्या पालकांच्या रस्सीखेच या खेळाने करण्यात आली. पालक व शिक्षकांसाठी नेमबाजी, रायफल शूटिंग, स्लो सायकलींग व क्रिकेट अशा विविध खेळांचे आयोजन केले होते. पालकांनी खेळामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून खेळाचा मनमुराद आनंद लुटला. आपल्या पालकांचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व विद्यार्थी मैदानावर उपस्थित होते. विजेत्या खेळाडू पालकांना प्रशस्तीपत्र, चषक व ढाल देऊन सन्मानित करण्यात आले. अशा रीतीने वार्षिक क्रीडा स्पर्धांची सांगता करण्यात आली.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर व सचिव सुरेंद्र चौगुले यांनीही सर्व क्रीडा स्पर्धांना भरभरून शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या प्राचार्या इंदिरा पाटील व उपप्राचार्या अंजना कोळी यांनीही पालकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. या सर्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन क्रीडाशिक्षक अतुल जाधव व संदीप पवार यांनी केले. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने सर्व वार्षिक स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पडल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.