प्रतिष्ठा न्यूज

भारतीय पोष्ट खात्यात महिलांनी सन्मान बचत करावी : अधिक्षक- पाळेकर

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : भारतीय पोष्ट (डाक) खात्याने महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र आणली असून, या योजनेत महिला किंवा मुलींना 31 मार्च 2025 पर्यंत किमान 1000 हजार व कमाल 2 लाख रुपये गुंतवणूक करता येईल. या गुंतवणुकीवर 7-5 टक्के चक्रवाढ व्याज मिळणार आहे. याचा महिला व मुलींना लाभ होणार असल्याने या योजनेचा आवश्य घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्ह्याचे डाकघर अधीक्षक- मा. राजीव पाळेकर यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय डाक खात्याने सर्व महिला व मुलींकरिता आकर्षक गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. या योजनेत महिला, मुली किंवा मुलीच्या नावावर तिचे पालक 31 मार्च 2025 पर्यंत महिला सन्मान बचत पत्र घेऊ शकतील. या बचत पत्राची मुदत दोन वर्षांपर्यंत राहील.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.