प्रतिष्ठा न्यूज

शासनदरबारी प्रलंबित भोई समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – पृथ्वीराज पाटील; भोई समाज घटकास छत्री वाटप

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.१२ : मासेमारी व विक्री व्यवसाय करणाऱ्या गणेशनगरातील भोई बांधवांना पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनच्या वतीने पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते
छत्र्या वाटप करण्यात आले. .
यावेळी पृथ्वीराज म्हणाले,”बारा बलुतेदारानंतर अठरा अलुतेदारापैकी भोई समाजातील बांधव हा मुख्यत: मासेमारी करून उदरनिर्वाह करतो.हा समाज प्रामाणिकपणे कष्ट करुन जगतो. गेल्या काही दिवसात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भोई बांधव मासेमारी करू शकले नाहीत. सततच्या पावसामुळे त्यांचे जीवनमान पूर्णतः विस्कळीत झाले. जाळी वाहून गेल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले.अशावेळी भोई समाज बांधवांना फौंडेशनच्या वतीने छत्र्या वाटप करुन भोई समाजातील मासेमारी करणाऱ्यांना मानसिक आधार देण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न आहे.महिनाभर सतत पडणाऱ्या पावसामुळे मासेमारी बंद आहे. त्यामुळे जे नुकसान झाले आहे ते शासनाकडून मिळवून देऊ आणि भोईसमाजासाठी मासेमारीसाठी लागणारी मदत पृथ्वीराज पाटील(बाबा) फाउंडेशन च्या वतीने करू.” असे म्हणाले.
शासनाकडून मोफत जाळे, अनुदान वाढ, अनुदान तत्त्वावर मत्स्यबीज घरकुल योजनेचा लाभ आणि भोई समाजातील मासेमारी करणाऱ्यांना दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करणे या प्रलंबित मागण्यांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असेही पृथ्वीराज पाटील म्हणाले.

छत्र्या वाटपावेळी विजय आवळे, सागर मुळे,दै. अक्षराज चे पत्रकार मा.प्रमोद चिनके, ॲड. गणेश आर. भोई,व्यापार सरिता चे मुख्य मा.संपादक अनिल आपटे, स्वप्नील जिरंगे, किरण काटकर, अमोल भिलवडीकर व त्यांचे सहकारी आणि भोई समाजातील बांधव व मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.