प्रतिष्ठा न्यूज

क्रांती दिना निमित्त मोटार सायकल रॅली : ‘वंदे मातरम’ घोषणानी परिसर दणाणून गेला

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा येथे आनंदी महविद्यालय, गगनबावडा यांचे वतीने मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गगनबावडा गाव भाग, आंबेडकर वसाहत, धनगरवाडा, जांभूळणे वाडी, पोलिस स्टेशन, तहीसलदार कार्यालय अशा ठिकाणाहून मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
यामध्ये महविद्यालयीन विद्यार्थी, पोलिस स्टेशन अधिकारी, तहसील कार्यालायातील नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे व मनोज देशमुख व त्यांचे सहकारी, प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील व सर्व प्राध्यापक सहभागी होते.संस्था अध्यक्ष प्रा. सतीश देसाई व प्रा. डॉ. विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. रॅलीचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. आदिनाथ कांबळे यांनी केले, डॉ. संतोष भोसले, प्रा. राहुल कांबळे,  प्रा. घाटगे आदीचें सहकार्य लाभले, भारत माता की जय, वंदे मातरम्, घोषणानी परिसर दणाणून गेला होता,
कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताने करण्यात आली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.