प्रतिष्ठा न्यूज

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व वनमंत्री यांनी 30 तारखेस शिवप्रताप दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रण

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई प्रतिनिधी : गेली पंधरा वर्षे शासनाच्या वतीने शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा होतो तो शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाने केलेल्या आंदोलनामुळे परंतु या कार्यक्रमास आज अखेर एकही राजकीय नेता उपस्थित राहिलेल्या नाही .परंतु प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्याजवळ वनखात्याच्या जागेवर अफजलखान भक्तांनी केलेल्या अनाधिकृत बांधकाम म्हणजेच अफजलखानाचा बेकायदेशीर दर्गा व 19 खोल्या जमीनदोस्त केल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमास राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व वनमंत्र्यांनी उपस्थित रहावे याकरिता शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी लेखी आमंत्रण दिले आणि ही धाडसी कारवाई केल्याबद्दल मंत्र्यांचा सत्कार केला . शिवप्रताप दिनी प्रतापगडावर शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा भव्य सत्कार महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी व राष्ट्रभक्तांनी तीस तारखेला होणाऱ्या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.