प्रतिष्ठा न्यूज

स्काऊट विद्यार्थ्यांतून भावी भारताचे आदर्श नागरिक घडतील : राज्य सहाय्यक आयुक्त गोविंद केंद्रे

प्रतिष्ठा न्यूज/विशेष प्रतिनिधी
लातूर दि.24 : स्काऊट विद्यार्थ्यातून भावी भारताचे आदर्श नागरिक घडतील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्काऊट सहाय्यक प्रशिक्षण आयुक्त श्री गोविंद केंद्रे यांनी केले स्काऊट आयुक्त श्री गोविंद केंद्रे यांची यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य स्काऊट प्रशिक्षण केंद्र मुंबई येथे येथे नियुक्ती झाली आहे.
त्यामुळे त्यांचा नांदेड जिल्हा स्काऊटर यांच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देतांना श्री केंद्रे म्हणाले की, स्काऊट-गाईड सामाजिक चळवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण आपल्या ला महामहीम राष्ट्रपती यांना प्रत्यक्ष भेटता येते. त्यांच्या सोबत संवाद साधता येतो .आज लाखो विद्यार्थी, विद्यार्थ्यीनी स्काऊट- गाईड मध्ये शिक्षण घेत आहेत ही खरोखर आनंदाची बाब आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे शिबिरे आयोजित करण्यात आले नाहीत.मात्र आता या शिक्षणास सुरूवात झाली असून केवळ स्काऊट विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार यांवर समाधान न मानता राष्ट्रीय पुरस्कार ( राष्ट्पती पदक) पुरस्कार प्राप्त करावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा शिबीर सहाय्यक संघटन आयुक्त श्री जनार्दन इरले,संघटन आयुक्त डॉ.शंकर चामे,स्काऊटर श्री युवराज माने,दैनिक लोकमतचे पत्रकार श्री संजीवकुमार देवनाळे,दै.प्रतिष्ठा पोर्टल न्युज पत्रकार श्री राजू पवार यांचा सत्कार करण्यात आला.
शिबीर यशस्वी करण्यासाठी स्काऊटर श्री हेमंत बेंडे,एल.एम.भोसले,एच.एम.पठाण,संजीवकुमार देवनाळे,एल.एस.मांजरे,एम.व्ही.पाटील,यु.बी.किडीले, ए.डब्लू,केंद्रे,डी.जी.पाटील, संतोष पोलशेटवार,पी.जे.भोसले, श्री बालाजी तोरणेकर आदिजणांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊटर हेमंत बेंडे यांनी केले तर आभार श्री एल.एस.भोसले यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.