प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा येथील दुय्यम निबंधक पदी नेमणूक; रिक्त पद तब्बल चार वर्षानंतर भरले

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
कोल्हापूर, ता.२४ : गगनबावडा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील रिक्त असलेल्या पदावर व्ही. डी. कुंभार यांची कायमस्वरूपी नेमणूक झाली असून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापुढे कार्यालयात दररोज दस्तऐवज नोंदणी होणार आहे. जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
या अगोदर आठवड्यातील फक्त मंगळवारी व गुरुवारीच दस्तऐवज नोंद केले जात होते. सन २०१८ पासून गगनबावड्या साठी दुय्यम निबंधक हे दर आठवड्याला नवीन प्रभारी अधिकारी दिले जात होते. त्यामुळे नागरिकांची फारच कुचंबना होत होती.
मात्र कायमस्वरूपी डाटा एन्ट्री कर्मचारी, शिपाई इत्यादी पदावर अद्याप कायम नेमणूक नसल्याने ती तात्काळ नेमणूक करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

चौकट:- सन 2018 पासून दुय्यम निबंधक पदाची जागा रिक्त होती. दरम्यानच्या काळात ‘ स्वयंघोषित ‘ दस्त लेखक आणि एजंट यांच्या हस्तक्षेपामुळे येथे अनेक ‘ प्रताप’ घडल्याची चर्चा आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.