प्रतिष्ठा न्यूज

“भारत जोडो” यात्रा अभूतपूर्व प्रतिसादाने महाराष्ट्रात यशस्वी नांदेड-लातूर मतभेदाचे वृत्त निराधार आणि तथ्यहीन..

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : काँग्रेस पक्षाचे नेते मा.खा.राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली “भारत जोडो” यात्रा अभूतपूर्व प्रतिसादाने महाराष्ट्रात यशस्वी ठरलेली आहे. असे असताना काही प्रसार माध्यमातून या निमित्ताने नांदेड-लातूर जिल्ह्यात मतभेद उघड झाल्यासंबंधीचे प्रसिद्ध झालेले वृत्त तथ्यहीन आणि निराधार आहे.
“भारत जोडो” यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आली असता तेथील स्वागताची जबाबदारी अशोकरावजी चव्हाण यांच्यावर तर नांदेडला लगत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात यात्रेचे स्वागत करण्याची जबाबदारी लातूर जिल्ह्यावर होती त्यामुळे नांदेडच्या कार्यक्रमाला जाता आले नाही, ही वस्तुस्थिती लक्षात न घेता दैनिक लोकसत्ता, एबीपी माझा व इतर प्रसिद्ध माध्यमातून नांदेड- लातूर तसेच मा. अशोकरावजी चव्हाण आणि मी यांच्यात मतभेद आणि दुरावा निर्माण झाल्याच्या संदर्भाने प्रसिद्ध झालेले वृत्त तथ्यहीन आणि वस्तुस्थितीपासून कोसो दूर आहे. वास्तविक पाहता चव्हाण-देशमुख कुटुंबीयांचे संबंध हे अनेक दशकापासूनचे आहेत. या दोन्ही कुटुंबामध्ये ओलावा जिव्हाळा प्रेम आणि सन्मान होता व आहे आणि पुढेही तो कायम राहणार आहे. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता कारण नसताना मतभेदाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
मा.अशोकरावजी चव्हाण आणि मी यांच्यात बरे चालले आहे हे काही जणांना पहावत नाही हेच यातून स्पष्ट होत आहे. “भारत जोडो” यात्रेचे यश, महाराष्ट्रात या यात्रेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी तर असे वृत्त प्रसिद्ध केली जात नाहीत ना? असा प्रश्नही माझ्यासारख्याच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
असेही मा.अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.