प्रतिष्ठा न्यूज

22 डिसेंबर 2022 रोजी माळेगाव यात्रेची देवसवारी- यात्रे संदर्भाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : दक्षिण भारतात सर्वात मोठी असलेल्या व नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या लोहा तालुक्यातील माळेगाव येथील यात्रेच्या अनुषंगाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीला माळेगाव ग्राम पंचायतचे सरपंच यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
बैठकीत माळेगाव यात्रेच्या नियोजनाबाबत चर्चा पार पडली. माळेगाव यात्रेत अमावस्येच्या दिवशी देवसवारी काढली जाते. यंदा दि 22 डिसेंबर 2022 रोजी अमावस्या असल्याने देवसवारी काढण्यात येईल, अशी माहिती ग्रामस्थांच्या वतीने बैठकीत देण्यात आली.कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून माळेगावची यात्रा झाली नाही. कोरोनाचे नियम पाळून देवसवारीसह पदाधिकाऱ्याविना यात्रा पार पडली होती. माळेगाव यात्रेचे नियोजन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असते. पदाधिकारी संपुर्ण माळेगाव यात्रेचे नियोजन करतात. त्यावर प्रशासन शिक्कामोर्तब करते. परंतु यंदा पदाधिकारी नसल्याने प्रशासनाला पूर्ण अधिकार आले आहेत.
यावेळी जिल्हा परिषद सदस्यांचा हस्तक्षेप राहणार नाही. पदाधिकाऱ्यांविना यात्रा होणार असल्याने प्रशासनाला एक चांगली संधी मिळाली आहे.
68 लाखांचा निधी
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेसाठी प्रशासनाच्या वतीने 68 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. त्यापेक्षा अधिक खर्च होतो. गेल्या दोन वर्षांपासून यात्रा झाली नसल्याने एक कोटी 36 लाख माळेगाव यात्रेचा निधी शिल्लक आहे. हा निधी या वर्षी खर्च करावा, अशी मागणी होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदे कडून त्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. जवळपास 5 दिवस यात्रा चालणार आहे. या यात्रेच्या नियोजनावरही बैठकीत चर्चा झाली.
यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे. ग्रामपंचायतीच्यावतीनेही या यात्रेला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लागण्याची शक्यता घेऊन तशीच तयारी करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.