कुपवाड शहर परिसर व विस्तारित सर्व भागातील भुयारी गटार योजनेला 253 कोटींचा निधी मंजूर
प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : कुपवाड शहर परिसर व विस्तारित सर्व भागातील भुयारी गटार योजनेला 253 कोटींचा निधी मंजूर झाल्या बद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखरजी इनामदार यांच्या हस्ते विजयनगर येथील बुधवार आठवडी बाजार येथे लाडू वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक श्री राजेंद्र कुंभार, मा.कल्पना कोळेकर, मा.सोनाली सागरे,प्रसाद वळकुंडे राजू शेरकनाळे,महेश सागरे,दीपक वायदंडे, विजय झांबरे आदी उपस्थित होते.