प्रतिष्ठा न्यूज

शहिद मॅरेथॉन प्रमो रन ची सांगलीमध्ये दमदार सुरवात

प्रतिष्ठा न्युज/ योगेश रोकडे
सांगली : शहिद अशोक कामटे स्मृती फाउंडेशन आयोजित शहिद मॅरेथॉन दि. २६ मार्च २०२३ रोजी विश्रामबाग सांगली येथे आयोजित केली आहे. या मॅरेथॉन ची सध्या ऑनलाइन नोंदणी चालू आहे. तसेच ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक रविवारी प्रमो रन चे आयोजन केले आहे. आज ही प्रमो रन विश्रामबाग येथे सकाळी ०६:३० वाजता फिजिओथेरपीस्ट डॉ मनाल अंतिकांत व सहकारी स्वप्नील माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सांगलीतील बऱ्याच लोकांनी या प्रमो रनमध्ये भाग घेतला होता. विशेषतः यामध्ये बरेचजण आपल्या कुटुंबासोबत रन करण्यास आले होते.
           या प्रमो रनवेळी आयोजकांनी ही रन घेण्यामागे सांगलीकरांमध्ये रनिंग कम्युनिटीचा प्रचार व प्रसार करणे हा हेतू असल्याचे सांगितले. तसेच शहिद मॅरेथॉनमध्ये सांगलीकरांनी सहभागी व्हावे. तसेच आपले आरोग्य सुदृढ राहावे यासाठी या उपक्रमास प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.