प्रतिष्ठा न्यूज

प्रत्येक मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी लढा देऊ : श्री. सुनील घनवट

महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत ‘मंदिरांचे सरकारी नियंत्रण आणि संघर्ष’ या विषयावर उद्बोधन सत्र !

प्रतिष्ठा न्यूज  
जळगाव प्रतिनिधी :  सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारीकरण मुक्त करून भक्तांच्या नियंत्रणात द्यायला हवीत. ‘राममंदिर तो झांकी है । देशभर के लाख मंदिर अभी बाकी है ।’ त्यामुळे सरकारने नियंत्रणात घेतलेली सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्याचा मंदिर परिषदेच्या माध्यमातून संकल्प करूयामंदिरे सरकारीकरण मुक्त होण्यासाठीतसेच प्रत्येक मंदिराचे संरक्षण होण्यासाठी मंदिर पुजारीविश्वस्तमंदिरांचे सदस्यअधिवक्ते यांचे संघटन असणे आवश्यक आहेअन्य पंथीयांना त्यांच्या प्रार्थनास्थळांतून त्यांचे धर्मगुरु धर्मशिक्षण देतातमात्र हिंदूंना मंदिरांतून धर्मशिक्षण दिले जात नाहीमंदिर हे शक्तीकेंद्रभक्तीकेंद्र आणि धर्मशिक्षण देणारे केंद्र असले पाहिजेमंदिरात भाविक भक्तीभावाने दान देतातत्यामुळे मंदिरांतील निधी राजकीय स्वार्थापोटी विकास कामांसाठी वापरला जाऊ नयेमंदिरांचे विश्वस्तसदस्य यांचे उत्तम संघटन उभे राहिल्यास देशभरातील लाख मंदिरे सरकारीकरण मुक्त होतीलहिंदु जनजागृती समितीचे कोणतेही मंदिर नाहीमात्र प्रत्येक मंदिर हे हिंदु जनजागृती समितीसाठी धर्माचे केंद्र आहेत्यामुळे सरकारीकरण झालेले प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी लढा देऊअशी घोषणा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्रीसुनील घनवट यांनी केलीमहाराष्ट्र मंदिरन्यास परिषदेच्या दुसर्‍या दिवशीच्या ‘मंदिरांचे सरकारी नियंत्रण आणि संघर्ष’ या विषयावरील उद्बोधन सत्रात ते बोलत होते.

      या वेळी व्यासपिठावर ‘श्री काळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराजपंढरपूर येथील ‘श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिर संरक्षक कृती समिती’चे अध्यक्ष श्रीगणेश लंकेहिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी आणि पुणे येथील ‘श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थान’चे अध्यक्ष श्रीसुरेश कौदरे उपस्थित होते.

मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे जाईलतेव्हा मंदिरांचा विकास निश्चित ! –
महंत श्री सुधीरदासजी महाराजश्री काळाराम मंदिरनाशिक
 

           राजकीय आणि न्यायव्यवस्था क्षेत्रांतील काही व्यक्ती मोठेपणासाठी विश्वस्त मंडळांमध्ये येण्यासाठी प्रयत्नरत आहेतमंदिरे ही व्यक्तीगत लाभासाठी नाहीतजेव्हा मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे जाईलतेव्हा मंदिरांचा विकास निश्चित होईलदेवापुढे येणारे धन आणि सोनेनाणे यांवर देवाचा हक्क आहेमंदिरांविषयी खटले चालू झाल्यावर मात्र मंदिराचे लाखो रुपये अधिवक्त्यांच्या शुल्कासाठी खर्च होत आहेतमंदिराच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे परवडणारे नाहीहे रोखले नाहीतर मंदिरातील बजबजपुरी वाढत जाईलदेवा पेक्षा कुणीही मोठे नाहीहिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते तनमनधन अर्पण करून मंदिरांसाठी भारतभर फिरत आहेतअशा प्रकारे सर्वांनी या कार्यात योगदान देणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन ‘श्री काळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी केले.

श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी न्यायालयात याचिका करणार ! – श्रीगणेश लंकेअध्यक्षश्री विठ्ठलरुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीपंढरपूर  

 

    मंदिरातील वैभव आणि प्रतिष्ठा वाढल्यानंतर मंदिर सरकारीकरणाचा डाव रचला जातोपुजारी आणि विश्वस्त यांच्यातील अंतर्गत कलहामुळे मंदिरांचे सरकारीकरण होतेमात्र मंदिरांच्या सरकारीकरणानंतरही मंदिरांचे प्रश्न संपलेले नाहीतउलट मंदिरांमध्ये विविध घोटाळे झाले आहेतत्यामुळे पंढरपूर विठ्ठलरुक्मिणी मंदिर भक्तांच्या ताब्यात  येण्यासाठी भाजपचे खासदार डॉसुब्रह्मण्यम स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोतअसे प्रतिपादन पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिर संरक्षक कृती समिती’चे अध्यक्ष श्रीगणेश लंके यांनी केले.

विश्वस्तांनी एकमेकांना विश्वासात घेऊन काम केल्यास मंदिरांतील वाद मिटतील !
– अधिवक्ता सुरेश कौदरेअध्यक्षश्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थानपुणे

      मंदिरांमधील पुजारी आणि विश्वस्त यांमध्ये वाद निर्माण होत आहेतभीमाशंकर देवस्थानमध्ये वर्ष 1980 पासून निर्माण झालेला वाद पुढे 20 वर्षे चाललाहा वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी मंदिराचे विश्वस्त एकत्र आलेअशा प्रकारे मंदिरांच्या व्यवस्थापनासाठी विश्वस्तांनी एकमेकांना विश्वासात घेऊन कार्य केल्यास वाद होणार नाहीतअसे प्रतिपादन पुणे येथील ‘श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थान’चे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरे यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.