प्रतिष्ठा न्यूज

तासगावकरांची ‘जनरल चॅम्पियनशिप’

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : जिल्हा परिषद सांगली अंतर्गत विविध विभागांच्या तब्बल 15000 कर्मचाऱ्यातून दहा तालुके व जिल्हा मुख्यालय संघामध्ये दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धा 16 वैयक्तिक व 10 सांघिक क्रीडा प्रकारांच्या मध्ये 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम सांगली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
सांघिक आणि वैयक्तिक सामन्यांच्या मध्ये दमदार कामगिरी करत 100 पैकी 78 गुण मिळवत तासगाव संघांने गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांच्या समर्थ नेतृत्वाखाली जनरल चॅम्पियनशिप पटकावली. सांघिक क्रीडा प्रकारांच्या मध्ये रस्सीखेच स्पर्धेमध्ये स्वतः गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांनी सहभाग नोंदवला.
हॉलीबॉल पासिंग पुरुष द्वितीय क्रमांक, कबड्डी महिला प्रथम क्रमांक वासंती खेराडकर, स्वाती पाटील, जयश्री पाटील, सुरेखा राजगे अश्विनी पाटील यांनी खेचून आणला. सांस्कृतिक कार्यक्रम द्वितीय क्रमांक यामध्ये एकनाथी भारुड परंपरागत वारकरी वेशात सादर करत भानुदास चव्हाण, वैभव बंडगर, सुधाकर पाटील, विस्तार अधिकारी प्रदीप शिरोटे, गंगाराम सलामे, पंडित पाटील, कृष्णा आणेकर, अरुण सावंत यांनी पटकावला.
कबड्डी संघामध्ये हेमंत भाट व संदीप खंडागळे, आनंद मुंडे यांनी चमकदार कामगिरी केली, खोखो संघामध्ये काकासो शेंडगे व अनिल म्हेत्रे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
वैयक्तिक खेळांच्या स्पर्धांमध्ये बॅडमिंटन खेळामध्ये बॅडमिंटन एकेरी पुरुष वैभव आंबी, दुहेरी मध्ये अमोल शिंदे यांचे बरोबर तर मिश्र दुहेरी मध्ये वैभव आंबी यांनी धनश्री माळी यांचे साथीने प्रथम क्रमांक मिळवला. बुद्धिबळामध्ये डॉक्टर अनुराधा सूर्यवंशी यांनी प्रथम तर पोहण्यामध्ये 50 मीटर व 100 मीटर मध्ये अविनाश गुरव यांनी प्रथम क्रमांक मिळविले.
गोळा फेक मध्ये महिलांच्या मध्ये कनिष्ठ अभियंता अमृता जाधव यांनी प्रथम तर पुरुषांच्या मध्ये शिक्षक पी.जी.शिंदे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. भालाफेक मध्ये चेतन खिल्लारे व अमृता जाधव यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. 400 मीटर धावणे स्वाती पाटील प्रथम, राहुल लोखंडे, अमोल यादव द्वितीय तर कीर्ती काटे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कॅरम एकेरी मध्ये नूतन परिट द्वितीय तर नलिनी हजारे यांनी तृतीय क्रमांक मिळवला व दुहेरी कॅरम मध्ये उपविजेत्या ठरल्या.पाच किलोमीटर चालणे सुखदेव पाटील तृतीय क्रमांक तर थाळी फेक मध्ये स्वाती पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
तासगाव पंचायत समितीचे कुटुंबप्रमुख आदरणीय गटविकास अधिकारी माननीय अविनाश मोहिते साहेब यांनी स्वतः आपल्या तासगाव संघाच्या गुलाबी जर्सी मध्ये पूर्णवेळ उपस्थित राहत कुटुंबप्रमुखाचे काम अतिशय चोख बजावले.
महिला खेळाडूंच्या मध्ये अर्चना बेले, सुरेखा राऊत, मीनाक्षी शितोळे यांनी सपोर्ट टीम म्हणून काम केले. अभियंता वृंदा पाटील यांनीही जल्लोषात सहभाग घेतला.


खेळाडूंचे सर्व गणवेश, मैदानावरील संचालन, ध्वज मानवंदना, खेळांचे परिचालन, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, खेळाडूंच्या नाश्ता व भोजनाची व्यवस्था सांस्कृतिक कार्यक्रमांची पूर्वतयारी व संघाला जनरल चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी आवश्यक तेथे सर्व उपलब्ध करून देण्यामध्ये गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांचे सोबत सहाय्यक गटविकास अधिकारी शंकर गावडे सर्व विभागांचे प्रमुख मनोहर कोरडे वैभव दिवटे अनिता होमकर दीपक लोणिष्टे यांनी सर्वतोपरी मदत केली.
तासगावच्या क्रीडा विभागात 2006 पासून तब्बल 17 वर्षे वैभव बंडगर व 2013 पासून 11 वर्षे काम करणारे वैभव आंबी या जय-वीरूच्या जोडीने खेळाडू निवड, प्रशिक्षण व सरावासाठी अखंड मेहनत घेतली. वैभव आंबी सरांनी तन-मन-धन सर्व अर्पून प्रत्येक खेळामध्ये लावलेली बाजी आणि जनरल चॅम्पियनशिप मिळत असताना स्वतः स्टेजच्या सर्वात मागे हात पाठीमागे बांधून इतरांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदामध्ये पाहिलेला आनंद खरोखर हृदय जिंकून गेला.
संघटनांचे पदाधिकारी दीपक काळे व कृष्णा पोळ, महादेव जंगम, शब्बीर तांबोळी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. चॅम्पियनशिप मिळाल्याबरोबरच आता चॅम्पियनशिप टिकवून ठेवणे. सातत्याने मिळवण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी तासगाव तालुक्यातील सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे आपल्या शारीरिक, मानसिक, व्यावसायिक आरोग्यामध्ये सातत्याने भर पडणार असल्यामुळे सर्व अधिकारी कर्मचारी स्वतःला फिट ठेवून सर्व विभागामार्फत तासगाव तालुक्यातील नागरिकांना लोकाभिमुख सेवा देतील, असा विश्वास गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांनी व्यक्त केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.