प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील ओम गणेश महिला बिजनेस ग्रुपकडून *महापालिकेच्या माझी वसुंधरा अंतर्गत* आणि संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी  : सांगलीतील ओम गणेश महिला बिजनेस ग्रुपकडून महापालिकेच्या माझी वसुंधरा अंतर्गत आणि संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या संस्कृतीक कार्यक्रमात सांगली आणि विश्रामबाग परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची आणि पैठणीचा खेळही घेण्यात आला. तसेच या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना मोफत मेहंदी काढण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली होती. ओम गणेश महिला बिजनेस ग्रुप कडून नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या विकासाच्या दृष्टीने आणि महिलांना अधिकाधिक व्यासपीठ मिळावा या उद्देशाने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. गृपप्रमुख शैलजा नवलाई, गीतांजली ढोपे पाटील, अर्चना पाटील, स्वप्निला नवलाई आणि स्वाती कोकाटे यांच्याकडून कार्यक्रमां मध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांना *माझी वसुंधरा अंतर्गत* पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे तुळशीची रोपे भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी लहान मुलांसाठी बोरनान कार्यक्रमही घेण्यात आला. संपूर्ण  याच कार्यक्रमांमध्ये सांगलीतील ए शाम मस्तानी सिंगिंग ग्रुपकडून दीपक चव्हाण आणि सोनाली केकडे यांनी बहारदार गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमास मालती डेव्हलपरचे रमाकांत घोडके, महापालिकेच्या सभागृह नेत्या भारतीताई दिगडे , प्रथम महापौर शैलजा नवलाई , नगरसेविका सविता मदने, उर्मिला बेलवलकर, कविता सारडा, देसाई मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तब्बल तीनतास रंगलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी मनसोक्त सहभाग घेत आनंद लुटला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.