प्रतिष्ठा न्यूज

पृथ्वीराज पाटील यांनी साकारलेल्या “मिले कदम, जुडे वतन” कॉफी टेबल बुक चे राहुल गांधी यांच्या हस्ते प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज
शेगाव प्रतिनिधी : शेगाव येथे झालेल्या भारत जोडो यात्रेच्या भव्य सभेत काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी सांगली शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी साकार केलेल्या “मिले कदम, जुडे वतन” या भारत जोडो यात्रेतील कन्याकुमारी ते हिंगोली प्रवास चित्रबद्ध करणाऱ्या कॉफी टेबल बुक चे प्रकाशन केले. यावेळी काँग्रेस नेते एआयसीसी संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल, छत्तीसगड चे मुख्यमंत्री भुपेशसिंह बघेल, खासदार मुकुल वासनिक, खासदार जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस चे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री आम.राजेश टोपे, माजी मंत्री आम. राजेंद्र शिंगणे खासदार फौजिया खान, आमदार विक्रमसिंह सावंत सर्व माजी मंत्री, खासदार, आमदार संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते.

राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा ही एक ऐतिहासिक घटना असून त्याचे विविध प्रकारे डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे या भावनेतून पृथ्वीराज पाटील यांनी हे कॉफी टेबल बुक साकार केले आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते हिंगोली दौर्यातील निवडक क्षणचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या क्षणचित्रामध्ये राहुल गांधी यांचे भावनिक फोटो, विविध समुहंबरोबर चे फोटो, छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतानाचा फोटो आदींचा समावेश आहे. या सर्व फोटोना साजेशी ऐतिहासिक कोट्स, लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांची प्रसिद्ध वाक्ये आशा भरगचच मजकुराने हा दस्तऐवज सजलेला आहे.

पृथ्वीराज पाटील यांच्या या अनोख्या उपक्रमाचे काँग्रेस च्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी स्वागत केले. स्वतः राहुल गांधी यांनी जवळपास पाच मिनिटे विशेष वेळ देऊन हे कॉफी टेबल बुक नजरेखालून घातले. राहुल गांधी यांनी या संपूर्ण दौऱ्यात स्वीकारलेल्या निवडक सत्कारात व कार्यक्रमात या कॉफी टेबल बुक चा समावेश केला. काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनी देखील हे कॉफी टेबल बुक हे भारत जोडो यात्रेच्या इतिहासाची नोंद करणारा महत्वाचा दस्त ऐवज आहे अशी भूमिका मांडली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.