प्रतिष्ठा न्यूज

खासदार संजयकाका पाटील यांच्या सांगलीतील मॉर्निंग वॉकला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद; प्रचंड मताधिक्याने काका विजयी होणार : नागरिकांच्या प्रतिक्रिया

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या मॉर्निंग वॉकला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. प्रचंड मताधिक्याने काका तुम्ही विजयी होणार अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. संजयकाका पाटील यांनी हा संपूर्ण दौरा पायी तसेच दुचाकीवरून केला.
आज मंगळवारी पहाटे पाच वाजता प्रसन्न वातावरणात मॉर्निंग वॉकला प्रारंभ केला. सकाळी लवकर बाहेर पडून आरोग्य जपण्यासाठी सजग असणाऱ्या नागरिकांशी संवाद, हास्य क्लब, योगा क्लब, स्विमिंग क्लब अशा विविध ठिकाणी भेटी देऊन विविध क्षेत्रातील नागरिक, महिला, कलाकार, खेळाडू, वृत्तपत्र विक्रेते यांच्याशी संवाद साधला.
या दौऱ्यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय या महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक सहभागी झाले होते.
दौऱ्याचा प्रारंभ पहाटे पाच वाजता वृत्तपत्र वितरण केंद्र आंबेडकर स्टेडियम सांगली येथून करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेतेत्यांशी चर्चा केली. त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्या सोडविण्याबात खासदार संजयकाका पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर दूध विक्रेत्यांशी संवाद साधला.
सांगली बसस्थानक परिसरातील पहाटेच सुरू झालेले चहा, नाष्टा सेंटर तसेच विविध आस्थापना यांना भेटी दिल्या. येथे प्रवाशी व नागरिक भरभरून प्रतिसाद देत होते.
त्यानंतर सकाळी सहा वाजता जोग एरोबिक्स विश्रामबाग येथे भेट दिली. स्वतः च्या आरोग्यासाठी सजग असणाऱ्या महिला व पुरुष यांंच्या कडून एरोबिक्स ची माहिती घेतली.
त्यानंतर बापट मळा म्हणजे महावीर उद्यान येथे मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसेच योगा ग्रुप सह सकाळी व्यायामसाठी येणाऱ्या विविध समूहांशी चर्चा करून मतदान करण्याचे आवाहन केले.
पुढे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरून तयार केलेल्या एक्स एल जीम येथे भेट दिली. तिथून पुढे कॅलीयोगा जीम येथे भेट दिली. पुढे त्रिकोणी बागेजवळ श्री भगवान महावीर मंदिरात दर्शन घेतले.
त्रिकोणी बागेत खुली जीम, योगा समूह तसेच व्यायाम करणारे विविध ग्रुप यांच्याशी चर्चा केली.
पुढे फक्त महिलांनी चालविलेल्या स्माईली योगा, प्राणायाम व हास्य क्लबला भेट दिली. या क्लब मध्ये जास्तीत जास्त वयस्क महिलांचा सहभाग आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आवश्यक सुविधा जाणून घेतल्या.


सांगलीचे ऑक्सिजन केंद्र असणाऱ्या आमराई ला भेट दिली. मोकळा श्वास आणि निसर्गाने बहरलेल्या आमराईत प्रवेश करताच नागरिकांनी संजयकाका पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच तुम्ही हॅटट्रिक करणारच असा विश्वास दिला. तसेच ऑफिसर क्लब येथेही भेट दिली.
पुढे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे क्रिकेट, ऍथलेटिक्स अशा विविध खेळाडू बरोबर खेळाचा आनंद लुटला. सांगली जिमखान्या जवळ
हनुमान रेस्टॉरंट येथे नागरिकांशी संवाद साधला.
आप्पासाहेब बिरनाळे महाविद्यालय जवळ असणाऱ्या नाष्टा सेंटर परिसरातील नागरिकांबरोबर चहापानाचा आस्वाद घेतला.

तिथून पुढे विश्राम बाग येथे गणेश नाष्टा सेंटर येथे अल्पोपहार करण्यास आलेल्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.


सर्व ठिकाणी नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते. मॉर्निंग वॉक दौरा विश्रामबाग येथे थांबविण्यात आला. संजयकाका पाटील म्हणाले, नागरिकांनी मताधिक्याने जिंकणार आहे असे सांगितल्याने आत्मविश्वास वाढला आहे. सांगली शहर तसेच सर्व मतदारसंघातील वातावरण आमच्यासाठी खूप चांगले आहे. गेल्या १०वर्षात केलेल्या कामाचे फळ मिळणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.