प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज स्कूलमध्ये संयोगिता पाटील यांची 55 वी जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज 
मिरज प्रतिनिधी : गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात केंब्रिज स्कूलमिरज च्या संस्थापिका सौ. संयोगिता पृथ्वीराज पाटील यांची 55 वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्रमुख अतिथी संयोगिता पाटील मॅडम यांच्या वहीनी नुतन पवार म्हणाल्यावहीनी या शिस्तप्रिय होत्याआपल्या संस्कृतीची जपनुक करणा-यासाठी त्यांची धडपड असायचीत्यांनी मुलांना सर्व सण समजावे यासाठी शाळेतच विविध सण साजरे करण्याची परंपरा सुरू केली.

आपल्यावरती अनेक संस्कार घडत असतातआई-बाबा व शिक्षक यांच ऐकलं पाहिजे.  मुलांनी तंत्रज्ञानाचा वापर कमी करावात्याचे परिणाम घातक आहेत असे संयोगिता वहिनी नेहमी म्हणायच्या.  अशा शब्दात शाळा अधिक्षिका ख्रिस्टीना मार्टीन यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शिक्षक अनिल सुतार, शिक्षीका शोभा काळे व पोपट चव्हाण सर यांनी वहीनींच्या जीवनाचा परिचय दिला.

माध्यमिक विभागामध्ये नोटीस बोर्ड डेकोरेशन स्पर्धा घेण्यात आली.

सीबीएसई विभागामध्ये संयोगिता पाटील यांच्या जीवनावरील डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली व चित्रकला व ग्रेटींग कार्ड मेकींग स्पर्धा घेण्यात आली.

पुर्व प्राथमिक विभागाच्या वतीने न्युट्रीशन डे साजरा करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळीमाध्यमिकचे मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलतपुर्व प्राथमिकच्या समन्वयक वंदना डोंगरेसर्व विभागाचे शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

तसेच संयोगिता वहीनींच्या जयंती निमित्त शाळेतील इ. 6 वी व इ. 7 वी मधील विद्यार्थ्यांची अपंग पुर्नवसन संस्थेच्या कै. रा. वि. भिडे मुकबधिर शाळामिरज येथे भेट देण्यात आली.  तेथील विद्यार्थ्यांना केंब्रिज स्कुलच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.

तेथील मुख्याध्यापक अभिजीत खवाटे यांनी विद्यार्थ्यांची माहिती दिली व रामचंद्र लोहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  तेथील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तु दाखविण्यात आल्या.  यावेळी वाचा प्रशिक्षण व श्रवण प्रशिक्षण विभागामध्येही भेट देण्यात आली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.