प्रतिष्ठा न्यूज

आमदार मोहनआण्णा हंबर्डे यांच्या गाडीला अपघात- लोहा चौकात खाजगी बसने दिली धडक- सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

प्रतिष्ठा न्यूज वसंत सिरसाट
नांदेड प्रतिनिधी : नांदेड दक्षिणचे मतदार संघाचे विद्यमान आ. मोहनआण्णा हंबर्डे यांच्या इनोव्हा गाडीला आज दि 23 डिसेंबर 2022 रोजी अपघात झाला सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोनी सेंटर जवळ आ.मोहनआण्णा हंबर्डे यांची इनोव्हा गाडी क्र.एमएच 26 सीडी 0909 ही थांबली होती, यावेळी नांदेड हुन कंधारला जाणारी खाजगी बस क्र.एमएच 14 बीए 9574 ने पाठीमागून जोराची धडक दिली असता इंडिकेटर फुटून मागील भाग दबला गेला असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. लोहा शहर व तालुक्यात अवैध प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. जादा फेऱ्यां मारण्याच्या नादात अवैध प्रवासी वाहतूक करणारे बस व काळीपिवळी टॅक्सीचालक भरधाव वेगात गाड्या चालवित असतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यातच हाही अपघात झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच लोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खासगी बस चालकाला अटक करुन ही खाजगी बस लोहा पोलीस स्टेशनमध्ये लावली आहे. या इनोव्हा गाडीत आ. मोहनराव हंबर्डे यांचे पुतणे नरसिंग धारोजीराव हंबर्डे हे लोहा येथील सोनी साडी सेंटर येथून कपडे खरेदी करून लातूरला नातेवाईकांकडे जात असताना सदरील घटना लोहा चौकात घडली.
या प्रकरणी लोहा पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.