प्रतिष्ठा न्यूज

महिलांनी आर्थिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे : तृप्ती धोडमिसे/प्रतिष्ठा फौंडेशनचा स्त्री प्रतिष्ठा सन्मान सोहळा उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्त्रीयांनी जगातली सर्वच क्षेत्रे काबीज केली आहेत. आता त्यांनी आर्थिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. प्रतिष्ठा फौंडेशन आयोजित सातव्या स्त्री प्रतिष्ठा सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. सांगली येथील रोटरी हॉलमध्ये हा सोहळा रविवार दि. २९ ऑक्टोंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
वैजयंता फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. ज्योती संजयकाका पाटील, डॉ. जयश्री पाटील, हेमलता पाटील, सामाजिक कार्यकत्या सौ. शरयू (माई) पाटील, मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, एमआयटी पुणेचे संचालक डॉ. महेश थोरवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव, सचिव सौ. विद्या जाधव, कु. प्रतिष्ठा जाधव यांनी संयोजन केले. प्रा. डॉ. प्रतिमा पैलवान, सौ. सुनिता पाटील यांनी सुत्र संचलन केले.
तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, महिलांसाठी सुरू असणार्‍या सर्व शासकीय योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे गेल्या आहेत. जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर त्यांनी आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजे. त्यासाठी विशेष स्वयंप्रयत्न करावेत. प्रतिष्ठा फौंडेशनने राज्यभरातील महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. या उपक्रमाचे कौतुक आहे.

प्रतिष्ठा फौंडेशनच्या वतीने दरवर्षी स्त्री प्रतिष्ठा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. विविध क्षेत्रातील महिलांना दिलेले पुरस्कार असे, प्रतिष्ठा आरोग्यरत्न पुरस्कार – डॉ. आशा मोघे-तळवळकर (वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, दानोळी ता. शिरोळ), सौ. प्रतिभा भैरव पाटील (प्र. जिल्हा हिवताप अधिकारी, सांगली), कू. धनश्री चौरे (फार्मासिस्ट ग्रामीण रुग्णालय हातकणंगले), श्रीमती वनिता अविनाश जाधव (औषध निर्माता अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी), स्त्री प्रतिष्ठा कृषिकन्या पुरस्कार- सौ. सविता रामचंद्र पवार (मणेराजूरी ता. तासगाव), स्त्री प्रतिष्ठा माता सन्मान पुरस्कार – श्रीमती सरोजनी प्रकाश गुरव (भिलवडी), स्त्री स्त्री प्रतिष्ठा उद्योजिका पुरस्कार – सौ. वैशाली संजय वायाळ (मनेजिंग डायरेक्टर, ईश्वेद ग्रुप ऑफ कंपनीज् पुणे), सौ. गीतांजली घोरपडे (संचालक, शिव इंटेरिअर, सांगली), सौ. सुनिता मारूती शेरीकर (बालाजी गारमेंट, हरीपूर ता. मिरज जि. सांगली), स्त्री प्रतिष्ठा अध्यापिका पुरस्कार – प्रा. निर्मला महेश थोरवे (व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री एज्युकेशन, पुणे), प्रा. स्मिता महेश कोरे (सहाय्यक प्राध्यापिका, शरद इन्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग यड्राव), प्रा. डॉ. श्रृती सुनिल निगुडकर (कार्यक्रम संचालक व्हिज्युअल आर्टस् विभाग एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे), सौ. उज्वला शंकरराव पाटील (वरिष्ठ मुख्याध्यापिका, जि. प. शाळा नं. २ सावळज), मा. जयश्री संभाजी मोहिते (सौ. प्रिती यादव) (जि. प. शाळा नं. १ चिंचणी ता. तासगाव), श्रीमती क्षमा शंकर भोरे (श्रीमंतीबाई सातगोंडा पाटील (मजलेकर) प्रॅक्टीसिंग स्कूल, सांगली), सौ. सुधा धनंजय सुतार (जि. प. शाळा, सावंतपूर वसाहत, ता. पलूस), सौ. बिना शामराव माने (मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक शाळा, भि. स्टेशन ता. पलूस), सौ. माया बाळासाहेब ठिगळे (अगंणवाडी क्र. ३०७ नेमिनाथनगर वाळवा), मा. मंगला दिगंबर वॉस्टर (जि. प. शाळा बन्नाळी ता. धर्माबाद जि. नांदेड), सौ. अंजली शहाजी माळी (कासेगाव ता. वाळवा), स्त्री प्रतिष्ठा क्रीडारत्न पुरस्कार – निता दत्तात्रय मोरे (राष्ट्रीय कोच तायक्वॉंदो, कवलापूर), स्त्री प्रतिष्ठा समाजसेविका पुरस्कार – श्रीमती स्वप्नाली महादेव पाटील (संस्थापक अध्यक्ष, ग्राम उन्नत्ती फौंडेशन, येडेनिपाणी), सौ. मंजुळा श्रीमंत साळे (सदस्य-वासुंबे ग्रामपंचायत वासुंबे), सौ. स्नेहा ऋषिकेश पेंढे जकाते (मानसशास्त्रज्ञ स्नेहबंध समुपदेशन केंद्र, मल्लेवाडी, ता. मिरज), सौ. पुजा संतोष कचरे (सामाजिक कार्यकर्त्या, कोल्हापूर), सौ. किरण चैतन्य हंचनाळकर (अध्यक्ष, जायंटस ग्रुप अस्मिता सहेली तासगाव), सौ. रूपाली नंदकिशोर कांबळे (समाजिक कार्यकर्त्या, भिलवडी ता. पलुस जि. सांगली), सौ. तेजस्वी विठ्ठल पाटील (ईश्वरी फौंडेशन, कुमठे ता. तासगाव जि. सांगली) डॉ. सौ. रजनीताई मुरलीधर शिंदे (संस्थापक अध्यक्ष, वेध फौंडेशन, महाराष्ट्र राज्य), सौ. अश्‍विनीताई बापुसो मिठारी (सामाजिक कार्यकर्त्या, रामानंदनगर, किर्लोस्करवाडी ता. पलूस)

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.