प्रतिष्ठा न्यूज

विश्रामबाग शाळा क्रमांक 7 ला स्कूल बस प्रदान

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विश्रामबाग शाळा क्रमांक 7 ला स्कूल बस प्रदान करण्यात आली.
आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या आणि माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्या उपस्थितीत या स्कूल बसचे लोकार्पण करण्यात आले. महिला बाल कल्याण विभागाच्या 5 टक्के निधीतून ही स्कूलबस घेण्यात आली आहे. यापूर्वी मिरजेतील शाळा क्रमांक 7 आणि 19 या मनपा शाळांना स्कूल बस देण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यात शाळा प्रशासनाने आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्याकडे स्कूल बसची मागणी केली होती. यावेळी आयुक्त तथा प्रशासक पवार यानी शाळेचा पट वाढवा आम्ही बस देऊ अशी ग्वाही दिली होती. मागणी केली त्यावेळी शाळेचा पट६० इतका होता. त्यानंतर ही पट संख्या वाढून आता पटसंख्या ३२८ च्या आसपास पोहचली आहे. त्यामुळे पटसंख्या वाढल्यामुळे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार आणि माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्या सूचनेनुसार शाळा क्रमांक 7 साठी स्कूल बस मंजूर केली होती. यासाठी तसेच स्मृती पाटील उप आयुक्त यांच्या माध्यमातून स्थानिक माजी नगरसेविका सविता मदने, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने यांनी आज या स्कूल बसचे लोकार्पण करण्यात आले. ही स्कूल बस 20 प्रवाशी क्षमतेची असून साधारण 14 लक्ष रुपयांची आहे. या स्कूलबस मधून विश्राम बाग, विजयनगर, धामणी , साखर कारखाना, वानलेसवाडी, विजयनगर, हनुमान नगर, कॉलेज कॉर्नर आदी भागांतून विद्यार्थी आणले जाणार आहेत. त्यामुळे आता या शाळेची पटसंख्या वाढायला मदत होणार आहे. या स्कूलबस लोकार्पण प्रसंगी उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त पंडित पाटील, माजी नगरसेविका सविता मदने, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, नगररचनाकार वैभव वाघमारे, प्रमोद रजपूत, शिक्षण मंडळाचे लेखापाल गजानन बुचडे, श्री शिंदे , शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता सौंदते, शाळा दत्तक पालक राकेश दड्डेनावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाखा अभियंता महेश मदने यानी शाळेसाठी दिलेल्या प्रोजेक्टरचे उद्घाटन करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.