प्रतिष्ठा न्यूज

कणेरी मठात पत्रकार भूषण पाटील यांच्यावर झालेल्या मारहाणी बाबत चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी सांगलीत पोलीस अधीक्षकांना पत्रकारांचे निवेदन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कोल्हापूर येथील टीव्ही 9 चे पत्रकार भूषण पाटील यांना झालेल्या मारहाण प्रकरणी तसेच ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना दिलेल्या धमकी प्रकरणी काल मराठी पत्रकार परिषदेच्या सांगली जिल्हा सोशल मीडिया परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष तानाजीराजे जाधव व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिले. शिवाय याबाबतीत मराठी पत्रकार परिषदेची भूमिका ही स्पष्ट केली. भूषण पाटील यांच्या सोबत परिषद आणि पत्रकार कायम आहेत. प्रसंगी अटकेची कारवाई न झाल्यास सांगलीतून कोल्हापूरला जाऊन जिल्ह्यातील पत्रकार आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

कोल्हापुरातील टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीचे पत्रकार भूषण पाटील यांना कणेरी मठात अन्नातून विशबाधा होऊन मृत्यूमुखी पडलेल्या गायची माहिती घेण्यासाठी गेले असता, मारहाण करण्यात आली आहे. याचा सांगलीतील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त करत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले .
दरम्यान नुकताच कणेरी मठात लोकोत्सव साजरा करण्यात आला. या लोकोत्सव दरम्यान अनेक गाईंचा अन्नातून विशबाधा झाल्याने मृत्यू झाला होता. यासंदर्भात माहिती घेऊन त्याचा चित्रीकरण करायला गेलेल्या टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीचे कोल्हापूर प्रतिनिधी भूषण पाटील यांना मारहाण करण्यात आली. सदर मारहाणी नंतर संबंधितावर गुन्हाही दाखल करण्यात आला.शिवाय सोशल मीडियातून शेकडो लोकांनी आपल्या भावना व्यक्त करत निषेध व्यक्त केला. अनेक ठिकाणच्या पत्रकारांनीही याचा तीव्र निषेध व्यक्त केला.आज सायंकाळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तींवर कारवाईची मागणी केली आहे. सदर निवेदन पोलीस अधीक्षकांच्या वतीने,पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी यांनी स्वीकारले.शिवाय सदर प्रकरणाबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार डॉ.सुभाष देसाई यांनाही कनेरी मठातील महादेव सावंत नामक व्यक्तींने धमकीवजा फोन केल्याचाही निषेध नोंदवण्यात आलाय. या व्यक्तीवरही कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी केली.
यावेळी टीव्ही 9 चे सांगली प्रतिनिधी शंकर देवकुळे, लोकशाही न्यूजचे प्रतिनिधी संजय देसाई, बीबीसीचे प्रतिनिधी सरफराज सनदी, दीपक चव्हाण, एबीपी माझाचे प्रतिनिधी कुलदीप माने. डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराजे जाधव, कार्याध्यक्ष अभिजीत शिंदे, जिल्हा सरचिटणीस मोहन राजमाने, शहराध्यक्ष सुधाकर पाटील, शहर कार्याध्यक्ष ज्योती मोरे, रेखा दामूगडे, मोहसीन मुल्ला आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.