प्रतिष्ठा न्यूज

तासगाव ब्राम्हण सभेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : प्रतिवर्षीप्रमाणे ब्राह्मण सभा, तासगांव यांच्या वतीने ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला.श्री विष्णु मंदीर येथे ब्राह्मण समाजातील शैक्षणिक, सामजिक,आर्थिक,सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील विशेष गुणवत्ता व सन्मान प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदीर शाळेचे मुख्याध्यापक श्री.मुकुंद जोग हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.ब्राह्मण सभेचे अध्यक्ष ॲड अजित कुलकर्णी व गुणगौरव सोहळा अध्यक्ष स्थानी श्री पद्माक्ष जोशी होतें.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड अजित कुलकर्णी यांनी केले.या प्रसंगी रूद्र हंचनाळकर, लक्ष्मण जोशी,अथर्व जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.लक्ष्मण जोशी यांनी निवेदन केले,अभिजित जोशी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.यावेळी मोठ्या संख्येने ब्राम्हण समाज बांधव उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.