प्रतिष्ठा न्यूज

प्रतिष्ठा न्यूज चा आज ५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा; सांगलीचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते झिंदाबाद पुरस्कारांचे वितरण; उद्योगपती मनोहर सारडा (काकाजी) यांना उद्योगभूषण तर रावसाहेब पाटील यांना सहकार भूषण पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : प्रतिष्ठा न्यूज चा आज ५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सांगलीचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते झिंदाबाद मिडिया हाउसच्या झिंदाबाद पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उद्योगभूषण पुरस्कार सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष उद्योगपती मनोहर सारडा (काकाजी) व सहकार भूषण पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांना देण्यात आला. यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे व माजी सरकारी वकील उल्हास चिप्रे उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, माध्यमांच्या स्पर्धेत टिकून राहणे अवघड आहे. तरीही प्रतिष्ठा न्यूजचे संपादक तानाजीराजे जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिष्ठा न्यूजचे चांगले नाव केले आहे. तानाजीराजे हे एक धडाडीचे पत्रकार आहेत. अनेक विषयांना त्यांनी वाचा फोडली आहे. दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा त्यांनी पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील, मनोहर सारडा (काकाजी), रावसाहेब पाटील यांची भाषणे झाली. प्रतिष्ठा न्यूजचे संपादक तानाजीराजे जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यवस्थापकीय संपादक सौ. विद्या जाधव, प्रतिष्ठा जाधव, ॲड. प्रसाद साळुंखे, उपसंपादक योगेश रोकडे, जिल्हा प्रतिनिधी किरण कुंभार यांनी संयोजन केले. बहेनजी वैशाली पाटील यांनी सुत्रसंचलन केले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी झिदाबाद राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. झिंदाबाद राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार श्री. फिरोज गुलमोहम्मद शिकलगार (रा. कालेढोण ता. खटाव जि. सातारा), कृषीरत्न पुरस्कार श्री. विजयकुमार दत्तात्रय पवार (मु. पो. बांबवडे ता. पलूस जि. सांगली), श्री. विलासराव यशवंत पाटील मु. पो. शिगाव ता. वाळवा जि. सांगली, वृत्तरत्न पुरस्कार श्री. किरण पिराजी जाधव (सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, सांगली), क्रीडारत्न पुरस्कार श्री. प्रभाकर जगन्नाथ थोरवडे (क्रीडा शिक्षक, कराड जि. सातारा), शिक्षणरत्न पुरस्कार श्री. संभाजी आत्माराम माने (हेरले हायस्कूल हेरले, जि. कोल्हापूर), सौ. विजयादेवी विलासराव पाटील (माजी शिक्षण विस्तार अधिकारी, शिराळा पं. स), . श्री. प्रकाश भाऊ वायदंडे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सांगली शिक्षण संस्था), श्री. नितीन अशोक साने , (जि.प.प्रा. शाळा, विठोबा पाटील वस्ती, ता. माळशिरस जि. सोलापूर), श्रीमती राजश्री लक्ष्मण कणबूर (जिजामाता कन्या प्रशाला अकलूज ता. माळसिरस जि. सोलापूर), समाजरत्न पुरस्कार – श्री. घनःशाम राजाराम कुंभार (पेडकर) (सामाजिक कार्यकर्ते, इचलकरंजी जि. कोल्हापूर), सौ. स्वाती संतोष कोल्हापूरे ( सामाजिक कार्यकर्त्या, सांगली), श्री. मिलिंद विश्वनाथ सुतार सामाजिक कार्यकर्ते, तासगाव जि. सांगली) , श्री. शशिकांत शंकर गायकवाड राज्य संघटक, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई, श्री. सुनिल आनंदराव पोळ (सामाजिक कार्यकर्ते, शिरोळ जि. कोल्हापूर) श्री. भास्कर मारूती पाटील (सांगली जिल्हाध्यक्ष, पोलीस पाटील संघटना,, पोलीस पाटील भिकवडी बु. ता. खानापूर), श्री. अरूण पांडूरंग माळी (सामाजिक कार्यकर्ते, विसापूर ता. तासगाव), श्री. दिलीप राजाराम पवार माध्य. शिक्षक, सांगली शिक्षण संस्था, श्री. संजय कांबळे, धन्वंतरीरत्न पुरस्कार -डॉ. विनोद लक्ष्मण मोरे (जिल्हा हिवताप अधिकारी, कोल्हापूर), डॉ. युवराज कोळी (वैद्यकिय अधिकारी, कोल्हापूर), डॉ. देवेंद्र शिवाजी पोवार (वैद्यकिय अधिकारी, जयसिंगपूर जि. कोल्हापूर), आरोग्यरत्न पुरस्कार – श्री. सुनिल गुंडा हाक्के (मुख्य औषध निर्माण अधिकारी, कोल्हापूर), श्री. महेश शिवाजी जाधव (आरोग्य सेवक, कोल्हापूर), श्रीमती अमृता अजित परीट (आरोग्य सेविका, इचलकरंजी) , कृषीरत्न पुरस्कार श्री. रामचंद्र रघुनाथ सावंत (उपक्रमशिल शेतकरी, सांगली), आदर्श सरपंच पुरस्कार – श्री. विजय कल्लाप्पा खवाटे (सरपंच कोथळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर), श्री धनंजय सदाशिव गायकवाड (सरपंच खंडोबाची वाडी ता. पलूस जि. सांगली), समाजरत्न पुरस्कार – श्री. संगाप्पा बसगोंडा करोले (सामाजिक कार्यकर्ते, किर्लोस्करवाडी ता. पलूस जि. सांगली), श्री. मिलिंद दिनकर जाधव (सामाजिक कार्यकर्ते पलूस जि. सांगली), श्री. उमेश सुशिला रमेश कानडे (सामाजिक कार्यकर्ते, वाळवा), शिक्षणरत्न पुरस्कार – श्री. शिवाजी विठ्ठल कुकडे (शिवाजीनगर (माळवाडी) भिलवडी), प्रशासनरत्न पुरस्कार श्रीमती सिमा शंकर (शेवाळे लिपिक, आरोग्य विभाग, कोल्हापूर), साहित्यरत्न पुरस्कार – श्री. हरिबा महादेव कोळी (साहित्यिक, दानोळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर), साहसरत्न पुरस्कार – कु. अन्वी अनिता चेतन घाटगे जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.