प्रतिष्ठा न्यूज

तासगावात सरकारचा निषेध करत 35 मराठा तरुणांनी केले मुंडन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे. तासगाव तालुक्यातही आरक्षणाच्या मागणीचा रेटा वाढत आहे.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज पाटील जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.  त्याला तासगाव शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त पने पाठींबा दिला आहे.शहरात सुरु असलेल्या आमरण आणि साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक विविध मार्गाचा अवलंब करत आहेत. आमरण उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा म्हणून काल हजारो मराठा बांधवानी मशाल मोर्चा काढला.आमरण उपोषणास अनेक संघटनानी जाहीर पाठिंबा दिला आहे.आंदोलनाच्या आजच्या चौथ्या दिवशी सरकारचा निषेध म्हणून 35 मराठा युवकांनी मुंडन करून घेतले.आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी सरकारी वैद्यकीय तपासणी आणि औषध उपचार घेण्यास नकार दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.