प्रतिष्ठा न्यूज

खासदार संजयकाका पाटील यांची जिल्हाभर महामानव अभिवादन यात्रा ; भिमप्रेमींचा जल्लोष

प्रतिष्ठा न्यूज

सांगली प्रतिनिधी : खासदार संजयकाका पाटील यांनी आज महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सांगली जिल्ह्यातील विविध भागात भिम स्मृती स्थळांना भेटी देऊन महामानव अभिवादन यात्रा केली. विविध ठिकाणी भिमप्रेमींचा जल्लोष पहायला मिळाला.

भारतीय संविधानकर्ते महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हाभर विविध उपक्रम राबविण्यात आले. सर्वत्र भिमप्रेमींचा जल्लोष पहायला मिळत होता. खासदार संजयकाका पाटील यांनी सांगली येथील शास्त्री चौकात शनिवारी रात्री १२ वाजता अभिवादन यात्रा सुरू केली. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ सह विविध भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्थळांना भेटी देऊन अभिवादन यात्रा काढली.

तासगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अऔभिवादन केले. यावेळी आरपीआयचे भिमराव भंडारी, मोहन कांबळे, जितेंद्र कांबळे, दिपक अमृतसागर, भारतीय जनता पार्टीचे सुनील पाटील, हणमंत पाटील, जनार्दन खराडे, बाळासाहेब पाटील, तासगाव चे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, जाफर मुजावर यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

*मिरज* येथे खासदार संजयकाका पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, माजी महापौर संगिता खोत, मोहन व्हनखंडे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव, राजाभाऊ देसाई, जयगुण कोरे, निलेश हारगे, सागर व्हणखंडे, ज्योती कांबळे, शशिकांत वाघमोडे, गजानन कल्लाळे यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

*कवठेमहांकाळ* येथे खासदार संजयकाका पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी नाना वाघमारे, जनार्दन पाटील, लाला वाघमारे, सुखदेव पाटील, खंडू होवाळे, नगरसेवक सोमनाथ लाटोडे, जलाल शेकडे, रणजीत घाडगे, अजित माने, शिवाजी गावडे, महादेव सुर्यवंशी यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

जिल्हाभर महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स्थळांना भेटी देऊन महामानव अभिवादन यात्रा काढण्यात आली.

*विटा* येथील बौद्ध समाज बांधवांच्या भेटी घेऊन खासदार संजयकाका पाटील यांनी डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शंकर मोहिते, भारत कांबळे, संदीप ठोंबरे, सुमित भंडारे, रोहन कांबळे, निलेश मार्ले यांच्यासह बौद्ध बांधव उपस्थित होते.

*पलूस* येथील नव्या बस स्थानकाजवळ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच बौद्ध वसाहत येथे बौद्ध समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ऍग. के. डी. कांबळे, आदित्य वाघमारे, सागर कांबळे, निलेश वाघमारे, नेवरा कांबळे, प्रवीण कांबळे, रमेश कांबळे, अनिल कांबळे, पलूस स्वाभिमानी आघाडीचे अध्यक्ष निलेश येसुगडे, भारत इनामदार, कपिल गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

*अंकलखोप (ता. पलूस)* येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असणाऱ्या ऐतिहासिक स्मृतीस्थळी दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, सुधीर चौगुले, विनायक पाटील, राहुल जाधव, सुशांत सुर्यवंशी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. अभिवादन यात्रेदरम्यान अंकलखोप येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

*भिलवडी ता. पलूस* येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली. खासदार संजयकाका पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी संभाजी महिंद, चौघाड चिंचवडे, प्रदीप ऐतवडे, सुनील कुलकर्णी, उल्हास ऐतवडे, अभिजीत चौगुले, महावीर पपाठारे, चंद्रमणी रांजणे, घनश्याम मोरे, मिथुन कांबळे, राहुल मोरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.