प्रतिष्ठा न्यूज

बिसूरला महिलांच्या हस्ते अभ्यासिका कामाचा प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज
सांगलीः बिसूर (ता. मिरज) येथे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधकाम सुरू असलेल्या अभ्यासिकेच्या पहिल्या स्लॅबच्या कामाचा प्रारंभ गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व बिसूर विविध कार्यकारी सहकारी सोयसायटीच्या संचालकांच्या हस्ते झाला. सन २०२० पासून लोकसहभागातून अभ्यासिकेचा उपक्रम सुरू आहे. सुमारे अक लाख रूपयांची पुस्तके, कपाटे, खुर्च्या, संगणक व प्रिंटर अशी सोय करण्यात आली आहे.
आमदार सुधीर गाडगीळ व तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या सहकार्याने अभ्यासिकेचा प्रकल्प मंजूर झाला. त्याचे पहिल्या टप्प्यातील बांधकाम सुरू आहे. अभ्यासिका, ग्रंथालय व सभागृह असा एकूण प्रकल्प आहे.
ग्रामपंचायतीच्या आजी माजी महिला सदस्, विकास सोसायटीच्या महिला संचालकांना स्लॅब कामाचा प्रारंभ करण्याचा मान देण्यात आला. माजी सरपंच सौ. लिलावती पाटील, आशा पाटील, सदस्य मेघा कदम. सुलोचना पाटील, सुरेखा पाटील, वर्षाराणी पाटील, सुजाता जाधव, वहिदा मुजावर, सुनिता पाटील, सोसायटीच्या संचालक शारदा पाटील यांच्यासह माजी मुख्याध्यापक टी. डी. पाटील, सागर पाटील, विजय पाटील, धोंडिराम पाटील, किशोर साळुंखे, चंद्रकांत घारगे, रणजित पाटील आदि उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.