प्रतिष्ठा न्यूज

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात संशोधन प्रकल्प अहवाल विषयावर कार्यशाळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय , गगनबावडा येथे संशोधन प्रकल्प अहवाल कसा लिहावा (How to prepare Research Project Report) या विषयावर शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई होते. तर, अध्यक्षस्थानी सचिव व प्र-प्राचार्या डॉ. विद्या देसाई होत्या.
कार्यशाळा एकुण तीन सत्रामध्ये संपन्न झाली. पहिल्या सत्रात महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ ‌. एस. एस. पानारी यांनी Introduction to Research Methodology या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी संशोधनाची संकल्पना, प्रकार आणि रचना इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात आनंदीबाई रावराणे काॅलेजचे प्रा. के. पी. पाटील यांनी Data Analysis and Presentation या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी डेटा संकलन आणि विश्लेषणाच्या पद्धती, ग्रहितकाची पडताळणी याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे तिसरे सत्रात न्यु काॅलेज, कोल्हापूरचे काॅमर्स विभाग प्रमुख डॉ. ए. जी. सुर्यवंशी यांनी Select of Research Topic या विषयावर विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधत त्यांना संशोधन विषय कसा निवडावा. तसेच, तो निवडताना घ्यावयाची काळजी आणि प्रकल्प अहवाल अशा पध्दतीने तयार करावा. याबद्दल सविस्तर माहिती दिली.
प्रास्ताविक व आयोजन प्रा. आदिनाथ कांबळे यांनी केले. तर, सुत्रसंचलन प्रा. डी. के. पाटील यांनी केले. कार्यशाळेसाठी प्रा. एच. एस. फरास, प्रा. ए. एस. जमादार, प्रा. एस. एस. घाटगे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.