प्रतिष्ठा न्यूज

एमटीईएस शाळेची जुई जेऊरकर हिच्या लेखनाचा वेल गगनापर्यंत पोहचावा : दयासागर बन्ने

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : एमटीईएस शाळेची विद्यार्थिनी जुई जेऊरकर  अनुवादित बालकथा संग्रह ‘रसाळ गोष्टी’ या पुस्तकाचा  प्रकाशन सोहळा  ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांच्या हस्ते तसेच लेखक व कवी दयासागर बन्ने, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर ,सचिव सुरेंद्र चौगुले आणि मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी समन्वयक रश्मी कुलकर्णी, इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका इंदिरा पाटील यांच्या उपस्थितीत एमटीईएस  प्रशालेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. जुई जेऊरकर हिने शालेय वयात ; साहित्यिक विश्वनाथ यांच्या कविता वाचल्या ,अनुभवल्या आणि त्याचा अनुवाद मराठी भाषेत केला. एवढ्या लहान वयात जुई जेऊरकर हिने  मराठी  साहित्यात केलेले काम हिंदी आणि मराठी भाषिक साहित्याला प्रेराणा देणारे आहे.  येणाऱ्या काळात साहित्यातील  हिचे योगदान फुलत राहो असे मनोगत प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी व्यक्त केले.  तसेच तिच्या या कार्याचे कौतुकही केले. लेखक व कवी  दयासागर बन्ने यांनी जुईच्या लेखनाचा वेल गगनापर्यंत पोहचावा अशी सदिच्छा त्यांच्या मनोगतातून व्यक्त केली. सदर कायाक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद के ळकर यांनी जुईने अनुवादीत केलेल्या पुस्तकाचे कौतुक करून जुईला प्रेरणा देणाऱ्या पालकांचे व शिक्षकांचे कौतुक केले. मराठी शाळेतून येणाऱ्या काळात विविध क्षेत्रामध्ये झेप घेण्याची प्रेरणा देण्यासाठी एमटीईएस मराठी शाळा नेहमीच कटीबद्ध राहील अशी आशा त्यांनी  व्यक्त केली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी यांनी  जुईच्या भावी वाटचालीसाठी व तिच्या लेखनासाठी  शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी जुईचा आदर्श समोर ठेऊन आपल्यातीलही सुप्त गुणांना वाव द्यावा अशी इच्छा व्यक्त केली. सदर पुस्तक प्रकाशनाच्यावेळी जुईने आपल्या भावना व्यक्त केल्या. तिला मिळालेल्या मार्गदर्शनासाठी आई-बाबा, मुख्याध्यापक आणि  शिक्षक यांचे आभार मानले. तसेच तिची इतरही पुस्तके भविष्यात प्रकाशित होतील अशी ग्वाही दिली. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या  पार पाडण्यासाठी शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा. पृथ्वीराज (बाबा) देशमुख ,उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर ,सचिव सुरेंद्र चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.