प्रतिष्ठा न्यूज

रोटरी क्लब ऑफ तासगाव व इनरव्हील क्लब ऑफ तासगावचा पदग्रहण समारंभ संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : रोटरी क्लब ऑफ तासगाव व इनरव्हील क्लब ऑफ तासगावच्या सन २०२३-२४ या वर्षातील पदाधिका-यांचा पदग्रहण समारंभ बुधवार दि. ५ जुलै रोजी सायंकाळी समृद्धी मस्टीपर्पज हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.इनर व्हील क्लबचा पदग्रहण समारंभ सौ हर्षदा मराठे डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी,इनर व्हील यांचे हस्ते व रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ रो.शरद पै डिस्ट्रीक्ट गव्हर्नर इलेक्ट २०२४-२५ यांचे हस्ते संपन्न झाला.प्रथम इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट म्हणून सौ शैलजा पवार व सेक्रेटरी म्हणुन सौ. सुनंदा पाटील यांनी कार्यभार स्विकारला.२०२२-२३ या वर्षीच्या प्रेसिडेंट सौ.प्रिया जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावर्षी केलेल्या कार्याचा आढावा सेक्रेटरी सौ.विनया पाटील यांनी घेतला.यावेळी सौ.हर्षदा मराठे यांनी नुतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व २०२३-२४ यावर्षी डिस्ट्रीक्ट चेअरमन यांना अपेक्षित असलेल्या कामांची माहिती दिली.
त्यानंतर रोटरी क्लब ऑफ तासगावचे प्रेसिडेंट रो.राहुल तेली व सेक्रेटरी रो. अभिजित पवार व इतर पदाधिकारी यांचा शपथग्रहण समारंभ संपन्न झाला.२०२२-२३ चे प्रेसिडेंट रो धनराज जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सेक्रेटरी रो. तानाजीराव पाटील यांनी मागील वर्षीच्या केलेल्या कामांचा आढावा घेतला,यावेळी असिस्टंट गवर्नर रो जयराज सगरे व नुतन असिस्टंट गवर्नर रो. डॉ. चंद्रशेखर पुरंदरे यांनी शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुणे रो.शरद पै यांनी नुतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना यावर्षी मोठी समाजउपयोगी कामे हाती घ्यावीत असे आवाहन केले.त्यासाठी लागणारी मदन केव्हाही करण्यास तयार आहे असे सांगितले.आभार प्रदर्शन रो. संजय कुचकर यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रो.संजय नाईक व रो. अश्विन कोकणे यांनी केले.
या कार्यक्रमापूर्वी तासगाव येथील बस स्टँड येथे रोटरी कलब ऑफ तासगावने रु. ९२०००/- खर्च करून दिलेल्या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या (R.0.system) चे उद्घाटन रो शरद पै व सौ. हर्षदा मराठे यांचे हस्ते झाले. प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याबददल पाहुण्यांनी क्लबचे अभिनंदन केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.