प्रतिष्ठा न्यूज

सरकारीकरण झालेली मंदिरे भक्तांकडे सोपवून त्याचे संचालन करण्यासाठी हिंदु मंडळ स्थापन करावे ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज

प्रतिष्ठा न्यूज 

सांगली प्रतिनिधी : मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहेचर्चसाठी सुद्धा ‘स्वतंत्र चर्च समिती’ (डायसेशन बोर्डआहेहिंदूंच्या मंदिरांसाठी सुद्धा समिती किंवा मंडळाची स्थापना व्हायला हवीहिंदूंच्या मंदिरांचे सुव्यवस्थापन व्हावेयासाठी हिंदूंच्या समितीची आवश्यकता आहेजी मंदिरे सरकारच्या ताब्यात आहेतती भक्तांकडे सोपवून त्याचे संचालन या समितीकडे द्यावेअसे आवाहन नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी केलेते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मशिदींसाठी वक्फ बोर्डतर मंदिरांसाठी ‘सनातन बोर्ड’ का नाही ?’ या विषयावर आयोजित ऑनलाईन विशेष संवादात बोलत होते.

महंत श्री सुधीरदासजी महाराज पुढे म्हणाले, ‘‘अनेक प्रसिद्ध देवस्थानांच्या परिसरात मद्य आणि मांसाहारी पदार्थांची दुकाने असतातती थांबविली पाहिजेतकाही प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने सरकारने विकास आणि सोयीसुविधा जरी केल्या असल्यातरी त्या देवस्थानांच्या परंपरा आणि आध्यात्मिकता अबाधित ठेवण्याची जबाबदारी संबंधित देवस्थानाचे पुजारी आणि व्यवस्थापन यांची आहेतसेच ‘लँड जिहाद’द्वारे ‘वक्फ बोर्ड’ने लाखो एकर जमीन हडप केली जात आहेपुढे सुद्धा अनेक जमिनी ‘वक्फ बोर्ड’ आपल्या ताब्यात घेईलम्हणून या ‘वक्फ बोर्ड’वर सरकारने अंकुश ठेवायला हवा.’’

देवस्थान सेवा समिती’चे विदर्भ सचिव श्रीअनुप जयस्वाल म्हणाले की, मंदिरे आणि धार्मिक संस्था यांनी आता एकत्र यायला हवेतसेच मंदिरांसाठी ‘सनातन बोर्ड’ स्थापन केला पाहिजेमंदिर क्षेत्रातील लोकांमध्ये काही मतभेद असतीलतर ते चर्चा करून दूर केले पाहिजेततसेच सरकार मंदिरे ताब्यात घेऊन मंदिरातील पैशाने काही समाजपयोगी कार्यक्रम राबवतेम्हणून सरकार चांगले आहेअसे म्हणता येणार नाहीकारण असे उपक्रम सरकारीकरण न झालेली मंदिरे तथा मंदिरांचे भक्तही राबवतातयातून हिंदूंच्या धार्मिक भावनाही जपल्या जातात.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.