प्रतिष्ठा न्यूज

प्रतिष्ठा न्यूजने सकारात्मक बातम्यांमुळे समाजात स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले : आयुक्त सुनिल पवार; प्रतिष्ठा न्यूजचा चौथा वर्धापन दिन व झिंदाबाद पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सकारात्मक बातम्या देऊन समाजात व माध्यविश्वात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करता येऊ शकते हे प्रतिष्ठा न्यूजने दाखवून दिले आहे. असे प्रतिपादन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त सुनिल पवार यांनी केले. प्रतिष्ठा न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने झिंदाबाद राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न झाला. पुरस्कार प्रदान सोहळा आयुक्तांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

रोपाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळ्याचे उद्धघाटन करण्यात आले.

रोपाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळ्याचे उद्धघाटन करण्यात आले. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डि. जी. कणसे, प्रा. डॉ. प्रतिभा पैलवान, उद्योजक दिनेश पवार हे प्रमुख उपस्थित होते. प्रतिष्ठा न्यूजचे संपादक तानाजीराजे जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुत्र संचालन पत्रकार कुलदीप देवकुळे यांनी केले. शाहीर चंद्रकांत गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संजयोजन प्रतिष्ठा न्यूजचे उपसंपादक योगेश रोकडे, व्यवस्थापक सौ. विद्या जाधव, प्रतिष्ठा जाधव, पूर्णांक जाधव, संतोष औंधकर, प्रसाद बिनवडे, किरण कुंभार यांनी केले.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त सुनिल पवार

आयुक्त सुनिल पवार म्हणाले, प्रसार माध्यमांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. माध्यमांचे नवनवे फंडे आपल्या समोर येत आहेत. क्राईम तसेच नकारात्मक बातम्यांना फाटा देऊन प्रतिष्ठा न्यूज या वेबपोर्टलने प्रसार माध्यमांमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. आजच्या जगात केवळ सकारात्मकता ठेवून प्रबोधनाच्या मार्गाने जाणे सोपे राहिलेले नाही. परंतु हे कार्य प्रतिष्ठा न्यूजचे संपादक तानाजीराजे व त्यांच्या सर्व प्रतिनिधींनी नेटाने सुरू ठेवले आहे. हा एक आदर्श वस्तुपाठ आहे. आपण सर्वांनी आता पर्यावरण वाचविण्यासाठी पुढे आले पाहिजे. माझी वसूंधरा अभियानात सहभाग घेतला पाहिजे. प्लॅस्टिक नाकारले पाहिजे. नद्या स्वच्छ राहाव्यात यासाठी प्रत्यन केला पाहिजे. असे आवाहन आयुक्तांनी केले.
प्रतिष्ठा न्यूजचे दिवसेंदिवस मोठे होत जाऊ दे. अशा शुभेच्छा आयुक्तांनी दिल्या.

प्राचार्य डी. जी. कणसे

प्राचार्य डी. जी. कणसे म्हणाले, समाजात बातम्या देणारी अनेक माध्यमे आहेत. परंतु समाजहिताच्या बातम्या देण्याचे काम प्रतिष्ठा न्यूज करत आहे. सध्याच्या व्यावसायिक जगात अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी जपणारे माध्यम चालवणे जिकीरेचे असते. परंतु मोठ्या धाडसाने तानाजीराजे जाधव यांनी हे कार्य चालू ठेवले आहे.

प्रतिष्ठा न्यूजच्या राज्यभरातील प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणार्‍या गुणीजनांचा झिंदाबाद राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.

पुरस्काराचे मानकरी असे
झिंदाबाद आरोग्यरत्न पुरस्कार
मॉर्निंग ग्रुप मिरज (रोज एक तास व्यायामासाठी)

झिंदाबाद समाजरत्न पुरस्कार
श्री. तानाजीराव वसंतराव कदमबांडे (अध्यक्ष,स्वर्गीय ज्ञानू हरी बांडे गुरुजी ट्रस्ट शिगाव ता. वाळवा जि.सांगली)
श्री. कैलास कमलाकर घरत (संस्थापक-अध्यक्ष, युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन, मु.खारपाडा-पेण- रायगड)
श्री. सुरज शिवमुरत यादव (संस्थापक अध्यक्ष, एकनिष्ठा सतीफैल खामगांव ता. खामगांव जि. बुलढाणा)
श्री. शिवगौंडा आप्पासो पाटील / सौ. विमल शिवगौंडा पाटील (दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर)
श्री. राजाराम आण्णा शिंदे (मु. पो. शिरगाव ता. वाळवा जि. सांगली)
मा. सारीका साबळे पुणे, श्री. विजय खेत्रे (खेत्रे परिवार मोफत अन्नछत्र, सांगली)

झिंदाबाद शिक्षणरत्न पुरस्कार
डॉ. भागवत शंकर महाले (कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक)
श्री. सुभाष राजाराम शिंदे (जि. प. प्राथमिक शाळा, तालीचा मळा, बेवनूर ता. जत जि. सांगली)
प्रा. डॉ. नितीन कारभारी जाधव (शिक्षणाधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक)
श्री. विजय बाबू धेंडे / सौ. पौर्णिमा विजय धेंडे (मु. पो. भिलवडी, ता. पलूस जि. सांगली)
मा. रेखा अनिल दिक्षित (माजी प्राचार्य, कोल्हापूर)
सौ. विजयालक्ष्मी प्रशांत सणस (नूतन ज्ञानमंदीर कल्याण (पूर्व)
प्राचार्य उज्ज्वला गजेंद्र साळुंखे (सुरवसे हायस्कूल, सोलापूर)
डॉ. सौ. शबनम संतोष माने (महात) (अभिजित कदम इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड सोशल सायन्स, सोलापूर)
प्रचार्य श्री. बसवराज कोरे (एम. पी. मानसिंग का. विद्यालयल ज्यु. कॉलेज, सोड्डी ता. मंगळवेढा जि. सोलापूर)

झिंदाबाद आदर्श पिता पुरस्कार
श्री. नारायण भगवान यादव (भिलवडी स्टेशन ता. पलूस जि. सांगली)
श्री. रमेश चंद्रकांत म्हैंदरकर (सामाजिक कार्यकर्ते, शिवाजी पेठ, कोल्हापूर)

झिंदाबाद आदर्श कला शिक्षक पुरस्कार
श्री. संदीप नारायण कदम (ब्रह्मानंद विद्यालय, बह्मानंदनगर ता. पलूस जि. सांगली)

झिंदाबाद सेवा गौरव पुरस्कार
डॉ. गायत्री विजय नांद्रेकर (सेवानिवृत्त वैैद्यकिय अधिकारी, सांगली)

झिंदाबाद उद्योगरत्न पुरस्कार
श्री. राजकुमार (तात्या) बाळू सावळवाडे (अध्यक्ष, आष्टा शहर महाराष्ट्र नव निर्माण सेना ता. वाळवा जि. सांगली)
श्री. नंदकिशोर अर्जुन कांबळे (मु. पो. भिलवडी ता. पलूस जि. सांगली)
श्री. श्रीकांत नामदेव साठे (माऊली उद्योग समूह माळवाडी (भिलवडी) ता. पलूस जि. सांगली)
श्री. सुरज संजय पवार (सी.ई.ओ. लोटस् ऍग्रो, भोसे फाटा भोसे ता. मिरज जि. सांगली)

झिंदाबाद आदर्श माता पुरस्कार
प्रा.सौ.मनिषा भगवान पाटील (औदुंबर (अंकलखोप) ता. पलूस जि. सांगली)
सौ. रंजना बाळासो टकले (माळवाडी. ता. पलूस जि. सांगली)
श्रीमती शशिकला दत्तत्राय औंधकर (माळवाडी (भिलवडी) जि.सांगली)

झिंदाबाद समाजभूषण पुरस्कार
श्री. गजानन देवाप्पा धनवडे (मु. पो. निमशिरगाव ता. शिरोळ जि. कोल्हापूर)
सौ. अरूणा अमोल सूर्यवंशी (सामाजिक कार्यकर्त्या, सांगली)
स्वराज्य फाऊंडेशन, नागठाणे ता. पलूस जि. सांगली
(संस्थापक, श्री. अंकुश रामचंद्र पाटील)
श्री. सचिन रघुनाथ घोरपडे (मु. पो. धोंडेवाडी ता. खानापूर जि. सांगली)
श्री. अनिल तानाजी शिंदे (प्रतिष्ठा न्यूज प्रतिनिधी सावळज ता. तासगाव जि. सांगली)
श्री. तानाजी सुबराव जमदाडे पाटील
(आरोग्य सेवक, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली)

झिंदाबाद आदर्श सरपंच पुरस्कार
सौ. संगिता रमेश कांबळे (जैनापूर, ता. शिरोळ जि. कोल्हापूर)
श्री. प्रशांत संभाजी माने (चोपडेवाडी ता. पलूस जि. सांगली)

झिंदाबाद कृषीरत्न पुरस्कार
श्री. सर्जेराव महादेव चौगुले (अंकलखोप, ता. पलूस जि. सांगली)

झिंदाबाद युवारत्न पुरस्कार
कु. रविना यादव (सामाजिक कार्यकर्त्या, वडूज ता. खटाव जि. सातारा)

झिंदाबाद आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार
सौ. सुषमा संभाजी कदम (दानोळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर)

झिंदाबाद आरोग्य भूषण पुरस्कार
श्री.दत्तात्रय वसंत खाडे (आरोग्य सहाय्यक दानोळी),
श्री. उदय नानासो आंबी (आरोग्य सहाय्यक, सांगली)

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.